शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
7
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
8
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
9
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
10
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
11
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
12
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
13
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
14
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
15
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
16
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
17
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
18
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
19
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
20
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
Daily Top 2Weekly Top 5

गोंदिया जिल्ह्यातील ७६ गावात नदी व नाल्याकाठी करावा लागतो अंत्यविधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2020 12:21 IST

Gondia news गोंदिया जिल्ह्यातील ७६ गावात स्मशानभूमी नसल्याने मृतकाच्या कुटुंबीय आणि नातेवाईकांना गावाबाहेरील मोकळी जागा अथवा नदी किंवा नाल्याकाठी  मृतदेहावर अंत्यसंस्कार करावे लागतात.

ठळक मुद्देगाव तिथे स्मशानभूमी योजना कागदावर पावसाळ्यात होते सर्वाधिक गैरसोय 

अंकुश गुंडावारलोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शासनाने गाव तिथे स्मशानभूमी ही संकल्पना राबविली. मात्र यानंतर अजूनही जिल्ह्यातील ७६ गावात स्मशानभूमी नसल्याने मृतकाच्या कुटुंबीय आणि नातेवाईकांना गावाबाहेरील मोकळी जागा अथवा नदी किंवा नाल्याकाठी  मृतदेहावर अंत्यसंस्कार करावे लागते. सर्वाधिक अडचण ही पावसाळ्याच्या दिवसात होते. मृतकाचा अंत्यविधी पार पाडण्यासाठी प्रत्येक गावात स्मशानभूमी असणे गरजेचे आहे. यासाठी शासनाकडून निधी देखील मंजूर केला जातो. मृत्यूनंतर मानवी देहाची विटबंना होवू नये, अखेरचा प्रवास सुखाचा व्हावा हीच अपेक्षा सर्वांची असते. मात्र जिल्ह्यातील ९३१ गावांपैकी अद्यापही ७६ गावात स्मशानभूमी नसल्याने तेथील गावकऱ्यांना अंत्यविधीसाठी नदी किंवा नाल्याच्या काठाचा आधार घ्यावा लागतो. मात्र पावसाळ्यात सर्वाधिक समस्या निर्माण होते. ही बाब गावकऱ्यांनी प्रशासनाच्या लक्षात आणून दिली पण अजुनही याची दखल घेण्यात आली नाही. 

मु.पो. खोलगड ता.सालेकसासालेकसा तालुक्यातील खोलगड या गावात अद्यापही स्मशानभूमीचे बांधकाम करण्यात आले नाही. त्यामुळे येथील नागरिकांना गावापासून ३ कि.मी.अंतरावर असलेल्या नाल्यावर जावे लागते. मागील आठ दहा वर्षांपासून या गावातील नागरिक ग्रामपंचायत आणि जिल्हा प्रशासनाकडे स्मशानभूमीसाठी जागेची मागणी करीेत आहेत. पण त्याची अद्यापही दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे गावकऱ्यांची समस्या कायम आहे. पावसाळ्याच्या दिवसात तर मृतदेहावर अंत्यविधी करण्यासाठी मोठ्या समस्येला तोंड द्यावे लागत असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले.

मु.पो. मुंडीकोटा ता. तिरोडातिरोडा तालुक्यातील मुंडीकोटा हे मोठे गाव असून या गावात अद्यापही स्मशानभूमीसाठी जागा नाही.त्यामुळे मुंडीकोटासह  दोन गावांना भंभोडी मार्गावरील रस्त्यालगत अथवा गावापासून २ कि.मी.अंतरावर असलेल्या वैनगंगा नदीच्या काठावर मृतदेहावर अंत्यविधी करावा लागतो. मात्र सर्वाधिक अडचण ही पावसाळ्याच्या दिवसात होते. स्मशानभूमीसाठी जागा निश्चित करुन त्या ठिकाणी शेड तयार करुन देण्याची नागरिकांची मागणी आहे. मात्र अजुनही ही मागणी मंजूर करण्यात आली नाही. त्यामुळे गावकऱ्यांची समस्या कायम आहे. 

टॅग्स :Governmentसरकार