शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

शोकाकुल वातावरणात चौघांवर अंत्यसंस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2018 23:29 IST

लगतच्या मध्य प्रदेश राज्यातील गांगुलपारा या पर्यटनस्थळी पाण्यात बुडून मृत्यू झालेल्या चार तरूणांवर सोमवारी (दि.२०) शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

ठळक मुद्देगावात स्मशान शांतता : अंत्यसंस्कारासाठी लोटला जनसमुदाय

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : लगतच्या मध्य प्रदेश राज्यातील गांगुलपारा या पर्यटनस्थळी पाण्यात बुडून मृत्यू झालेल्या चार तरूणांवर सोमवारी (दि.२०) शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. एकाच गावातील चार तरूणांना काळाने हिरावून नेल्याने गावात स्मशान शांतता होती. तर चौघांच्या अंत्यसंस्कारासाठी जनसमुदाय लोटल्याचे चित्र होते.जवळील ग्राम कटंगी येथील दीपक नेवारे, दुर्गेश घोसे, आशिष राठोड व विल्सन मदारे (सर्व रा.कटंगी) हे चार मित्र शनिवारी (दि.१८) गांगुलपारा येथे पिकनिकसाठी गेले होते. धबधब्याखाली आंघोळ करीत असताना अचानकच आलेल्या पुराच्या लाटेमुळे ते पाण्यात बुडाले व त्यांचा मृत्यु झाला. चारही तरूण घरी न परतल्याने रविवारी (दि.१९) त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांचा शोध घेण्यासाठी बालाघाट जिल्ह्यातील गांगुलपारा येथे गेले. त्यानंतर ही घटना उघडकीस आली. त्यानंतर लगेच त्यांचे मृतदेह शोधण्याचे काम सुरू केले असता दुर्गेश घोसे, आशिष राठोड व विल्सन मदारे या तिघांचा मृतदेह रविवारीच मिळाला. तर दीपक नेवारे याचा मृतदेह सोमवारी (दि.२०) सकाळी मिळाल्याची माहिती आहे. त्यामुळे चौघांच्या मृतदेहांची बालाघाट येथे सोमवारी उत्तरीय तपासणी करून त्यांचे मृतदेह कटंगी येथे आणण्यात आले. सोमवारी (दि.२०) दुपारी दुर्गेश, आशिष व दीपक यांच्या मृतदेहावर टेमनी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. तर विल्सनवर दफनविधी करण्यात आल्याची माहिती आहे.गावात फक्त एकच चर्चागावातील चार तरूणांचा अचानकच जीव गेल्याने कटंगीत सर्वांच्या तोडांत फक्त एकच याच घटनेचा विषय होता. त्यांच्या अंत्ययात्रेत गावातील सर्वांनीच हजेरी लावली, त्यामुळे गावात शुकशुकाट होता. चौघांच्या मृत्युमुळे गावकऱ्यांनाही एकच धक्का बसला व त्यांनी या दुखात सहभागी होत व्यापारपेठ बंद ठेवली होती.