गोंदिया : जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या उपस्थितीत गोंदिया नगर परिषदेचे अध्यक्ष कशिश जायस्वाल यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या वर्षा निवासस्थानी सोमवारी भेट घेऊन शहराच्या विकासाच्या योजनांबाबत चर्चा केली. गोंदिया शहरासाठी निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही यावेळी मुख्यमंत्र्यांनी त्यांना दिली.यावेळी नगराध्यक्ष जायस्वाल यांनी प्रामुख्याने शहरातील रखडलेली भूमिगत गटार योजना मार्गी लावून लवकरात लवकर काम सुरू करावे, नगर परिषदेतंर्गत २२० अस्थायी कर्मचाऱ्यांना स्थायी करण्यात यावे, तसेच शहराच्या सर्वागिण विकासासाठी केंद्र व राज्य शासनाकडून विविध योजनेंतर्गत मोठा निधी उपलब्ध करण्याची मागणी केली. दरम्यान शहरातील अनेक समस्यांवर यावेळी चर्चा करण्यात आली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी शहर विकासासंदर्भात सविस्तर चर्चा करून शहर विकासासाठी निधी कमी पडू देणार नसल्याचे आश्वासन दिले व इतर समस्या लवकरात लवकर सोडविल्या जातील असे शिष्टमंडळाला सांगितले. (जिल्हा प्रतिनिधी)
शहराच्या विकासाकरिता निधी कमी पडू देणार नाही
By admin | Updated: March 25, 2015 01:17 IST