पुतळीत भ्रष्टाचार : चौकशी झालीच नाहीशेंडा (कोयलारी) : गावकऱ्यांनी आमसभेत सन २०१२ ते २०१५ पर्यंत मग्रारोहयो, निर्मल व तंमुसला प्राप्त झालेल्या निधीचा लेखाजोखा मागताच ग्रामसेवक ए.व्ही. रामटेके यांनी कोरम पूर्ण होत नसल्याचे कारण पुढे करुन गाशा गुंडाळल्या. यावरुन वरील शासन प्राप्त रकमेचा मोठा गबाळ झाल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे.मग्रारोहयो, निर्मलग्राम व तंमुसला प्राप्त झालेल्या रकमेचा हिशेब मागताच ग्रामसेवकाने कोरम पूर्ण होत नसल्याचे कारण पुढे करून आमसभा तहकूब झाल्याचे जाहीर केले. मागील तीन वर्षात रोहयो अंतर्गत एकही काम झाले नव्हते. त्यामुळे गावकऱ्यांमध्ये रोष होता. त्यांचा रोष बघून पुढील आमसभा २२ आॅगस्ट रोजी घेण्यात येईल असे सांगण्यात आले. पुतळीच्या आमसभेसाठी प्रश्नावली तयार करुन ठेवली होती व लोकांची उपस्थिती २०० च्या वर होती. जि.प. सदस्य सरिता कापगते, उपसभापती विलास शिवणकर व विस्तार अधिकारी झांबरे हे ही उपस्थित होते. त्या सभेला सुद्धा ग्रामसेवक रामटेके हजर झाले नाही. यावरुन ग्रामपंचायतला प्राप्त झालेल्या निधीचा गबाळ झाला असावा अशी शंका जनतेच्या मनात बळावली. मागील तीन वर्षात विकासाचे एकही काम झाले नाही. त्याचप्रमाणे १५ सप्टेंबरपर्यंतच आमसभेची मुदत आहे. वरिष्ठ अधिकारी चौकशीच्या नावावर वेळ काढू धोरण अवलंबित आहेत. यावरून वरिष्ठांचे शुद्धा हात ओले झाले असावे, अशी शंका आहे. आमसभा झाली नाही तर गावातील समस्या जश्याच्या तश्याच राहतील असे गावकऱ्यांना वाटत आहे. सदर प्रकरणाची तक्रार मुख्य कार्यपालन अधिकारी जि.प. गोंदिया व खंड विकास अधिकारी पं.स. सडक अर्जुनी यांच्याकडे करण्यात आली. परंतु आजपावेतो चौकशी करण्यात आली नाही. (वार्ताहर)
मग्रारोहयो, निर्मलग्राम व तंमुसचा निधी हडपला
By admin | Updated: August 30, 2015 01:42 IST