शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पर्यटन विकासासाठी निधी कमी पडणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2019 00:33 IST

गोंदिया जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्याने जिल्ह्यातील पर्यटन स्थळांच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. मात्र पर्यावरणाचा बाऊ समोर करुन पर्यटन विकासात बाधा निर्माण करण्याचे काम काही प्रवृत्ती निरंतर करीत आहे.

ठळक मुद्देराजकुमार बडोले : २५ लाखांच्या रस्ता डांबरीकरणाचे भूमिपूजन

लोकमत न्यूज नेटवर्कनवेगावबांध : गोंदिया जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्याने जिल्ह्यातील पर्यटन स्थळांच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. मात्र पर्यावरणाचा बाऊ समोर करुन पर्यटन विकासात बाधा निर्माण करण्याचे काम काही प्रवृत्ती निरंतर करीत आहे. मात्र आम्ही कायदेशीर मार्ग काढून जिल्ह्याच्या पर्यटन विकास करीत राहू आणि याकरिता निधी कमी पडू देणार नाही असे प्रतिपादन राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.नवेगावबांध पर्यटन स्थळ अंतर्गत रस्ता डांबरीकरण कामाच्या भूमिपूजनप्रसंगी बुधवारी (दि.१६) ते बोलत होते. अध्यक्षस्थानी पं.स.सभापती अरविंद शिवणकर होते. प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच अनिरुद्ध शहारे, उपसरपंच रघुनाथ लांजेवार, जि.प. बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता आर.एस. नैरागकर, खंडविकास अधिकारी जमईवार, विजया कापगते, मधुकर मरस्कोल्हे, खुशाल काशिवार, केवळराम पुस्तोडे, तंमुस अध्यक्ष महादेव बोरकर, मुलचंद गुप्ता, अण्णा डोंगरवार, चंद्रशेखर मेश्राम तसेच ग्रा.पं.चे सर्व सदस्य प्रामुख्याने उपस्थित होते.नवेगावबांध ग्रामपंचायतकरिता १०० बैठकी खुर्च्याकरिता ४ लक्ष रुपयांचा निधी देत असल्याची घोषणा याप्रसंगी ना. बडोले यांनी केली. रमाई आवास योजनेंतर्गत शत प्रतिशत लाभार्थ्यांना घर देणार असल्याचे ते म्हणाले. त्याचप्रमाणे छत्तीसगड राज्यात धानाला जास्त भाव तेथील सरकार देत असल्याचा माजी खासदार नाना पटोले खोटा प्रचार करीत असल्याचा आरोप याप्रसंगी बडोले यांनी आपल्या भाषणातून केला. प्रास्ताविक कार्यकारी अभियंता वैरागकर यांनी मांडले. संचालन अशोक परशुरामकर यांनी केले. आभार ग्रामविकास अधिकारी पी.आर. चव्हाण यांनी मानले.झाशीनगर योजनेचे लोकार्पण व भूमिपूजन फेब्रुवारीतनवेगावबांध विस्तार अंतर्गत पिण्याच्या पाण्याबद्दल बोलताना ना. बडोले यांनी, झाशीनगर उपसा सिंचनाचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून दुसऱ्या टप्प्याचे नियोजन झाले आहे. त्यामुळे फेबु्रवारी महिन्यात पहिल्या टप्प्याचे लोकार्पण व दुसऱ्या टप्प्याचे भूमिपूजन करुन जनतेच्या सिंचन प्रश्नावर कायम स्वरुप तोडगा निघणार असल्याचे सांगीतले. तसेच शेतकऱ्यांच्या धानाला बोनस देण्याबद्दल आपले सरकार सकारात्मक असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याबाबत लवकरच निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :tourismपर्यटनRajkumar Badoleराजकुमार बडोले