शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
3
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
4
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
5
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
6
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
7
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
8
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
9
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
10
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
11
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
12
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
13
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
14
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
15
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
16
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
17
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
18
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
19
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
20
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
Daily Top 2Weekly Top 5

धडक सिंचन विहीर, रमाई घरकुल योजनेचा निधी द्या ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:32 IST

गोंदिया : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना धडक सिंचन विहीर योजने अंतर्गत विहीर मंजूर झालेल्या आहेत. बऱ्याच शेतकऱ्यांनी विहिरीचे बांधकाम पूर्ण केलेले ...

गोंदिया : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना धडक सिंचन विहीर योजने अंतर्गत विहीर मंजूर झालेल्या आहेत. बऱ्याच शेतकऱ्यांनी विहिरीचे बांधकाम पूर्ण केलेले आहे. या योजनेला शासनाने ३० जून २०२२ पर्यंत मुदतवाढ दिलेली असताना सुध्दा ज्या लाभार्थ्यांना विहीर मंजूर झालेल्या आहेत त्यापैकी अनेकांनी विहिरींचे बांधकाम केलेले आहे. मात्र निधी अभावी बऱ्याच शेतकऱ्यांच्या विहिरीचे बांधकाम अपूर्ण आहे. त्यामुळे यासाठी त्वरित निधी उपलब्ध करुन देण्याची मागणी अप्पर जिल्हाधिकारी राजेश खवले यांना दिलेल्या निवेदनातून जिल्हा काँग्रेस कमिटीने केली आहे.

निवेदनातून जिल्ह्यातील अनुसुचित जाती लाभार्थ्यांना रमाई घरकुल योजनेतुन घरकुल बनविण्यासाठी शासनाकडून अर्थसहाय्य मिळत असते. पंरतु गेल्या अनेक दिवसांपासून रमाई घरकुल योजनेअंतर्गत निधी उपलब्ध नसल्यामुळे त्यांच्या घरकुलाचे बांधकाम रखडलेले आहे. याचा लाभार्थ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाकडून अनुसूचित जाती व नवबौद्ध नागरिकांना स्वयंरोजगारासाठी अर्थसाहाय्य गोंदिया जिल्ह्यातील अर्थसाहाय्य वितरणाचे २७६ प्रकरणे प्रलंबित आहेत. स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देणे, निधीअभावी अर्थसाहाय्य योजनेचा लाभार्थ्यांना निधी उपलब्ध करून वितरण करण्यात यावा. आदिवासी विभागातील शबरी आदिवासी घरकुल योजनेचा लाभ लाभार्थ्यांना या उपयोजनेअंतर्गत आदिवासी क्षेत्रातील व आदिवासी बाह्य क्षेत्रातील अनुसूचित जमातीच्या पात्र लाभार्थ्याना २६९ चौ. फुट चटई क्षेत्र असलेले पक्के घरकुल उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने १६ जुलै २०२१ रोजी शबरी आदिवासी घरकुल योजनेचा शासन निर्णय पारित केला आहे. या सर्व योजनेचा लाभ लाभार्थ्यांना मिळवून देण्यात यावा. आदी मागण्यांचा समावेश होता. शिष्टमंडळात जिल्हाध्यक्ष डॉ. एन. डी. किरसान, आमदार सहषराम कोरोटे, प्रदेश सचिव अमर वराडे, पी. जी. कटरे, माजी आमदार दिलीपी बन्सोड, माजी जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कटरे, माजी जि. प. अध्यक्ष उषा मेंढे, ज्येष्ठ नेते झामसिंगभाऊ बघेले, युवा नेते अशोक (गप्पू )गुप्ता, कार्याध्यक्ष रत्नदीप दहिवले, उपाध्यक्ष रामलाल राऊत, महासचिव यादनलाल बनोठे, पृथ्वीराज चव्हाण यांचा समावेश होता.