शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
4
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
5
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
6
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
7
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
8
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
9
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
10
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
15
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
16
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
17
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
18
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
19
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
20
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
Daily Top 2Weekly Top 5

धानाच्या चुकाऱ्यांसाठी ३१२ काेटी रुपयांचा निधी झाला जमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:47 IST

गोंदिया : जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या शासकीय धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री करणाऱ्या गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे चुकारे तीन ...

गोंदिया : जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या शासकीय धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री करणाऱ्या गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे चुकारे तीन महिन्यांपासून थकले होते. त्यामुळे शेतकऱ्यांची कोंडी झाली होती. ही बाब लक्षात घेत खा. प्रफुल्ल पटेल यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांच्याशी चर्चा करून थकीत चुकाऱ्यांसाठी निधी उपलब्ध करून देण्याबाबत चर्चा केली. मंगळवारी (दि.४) चुकाऱ्यांसाठी ३१२ कोटी रुपयांचा निधी जिल्हा मार्केटिंग फेडरेशनला प्राप्त झाला आहे.

शासनाने भंडारा जिल्ह्यासाठी १७० कोटी ७७ लाख, तर गोंदिया जिल्ह्यासाठी १४२ कोटी ३ लाख रुपयांचा निधी जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या खात्यावर मंगळवारी वर्ग केला आहे. त्यामुळे बुधवारपासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर थकीत चुकाऱ्यांची रक्कम जमा होण्यास सुरुवात होणार आहे. खरिपात जिल्ह्यातील दीड लाखांवर शेतकऱ्यांनी शासकीय हमीभाव केंद्रावर धानाची विक्री केली होती. मात्र, यापैकी बऱ्याच शेतकऱ्यांचे चुकारे मागील दोन-तीन महिन्यांपासून थकले होते. त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली होती. त्यातच सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू असल्याने उद्योगधंदे ठप्प आहेत. याचा फटका शेतकऱ्यांनासुद्धा बसला होता. ही बाब आ. मनोहर चंद्रिकापुरे यांनी खा. प्रफुल्ल पटेल यांच्या निदर्शनास आणून दिली होती. त्यानंतर त्यांनी २७ एप्रिल रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांच्याशी चर्चा करून थकीत चुकाऱ्यांसाठी त्वरित निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. तेव्हा त्यांनी निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले होते. त्याचीच पूर्तता करीत मंगळवारी शासनाने गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यासाठी एकूण ३१२ कोटी रुपयांचा निधी प्राप्त करून दिला आहे. परिणामी शेतकऱ्यांची समस्या दूर झाली आहे.

.....

बोनसची रक्कम येणार लवकरच

शासकीय धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रति क्विंटल ७०० रुपयांप्रमाणे ५० क्विंटलपर्यंत बोनस देण्याची घोषणा महाविकास आघाडी सरकारने केली होती; पण धान विक्री करून पाच महिन्यांचा कालावधी लोटूनही ही रक्कम प्राप्त झाली नव्हती. यासंदर्भातसुद्धा खा. पटेल यांनी चर्चा केली असून, लवकरच बोनसची रक्कमसुद्धा जमा होणार आहे.