शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

स्वप्नपूर्ती, प्रवासी विमान वाहतूक सेवेचे टेक ऑफ आजपासून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2022 05:00 IST

गोंदिया तालुक्यातील बिरसी येथील विमानतळाची उभारणी ब्रिटिश सरकारने दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान १९४२-४३ मध्ये केली होती. त्यानंतर २००५ मध्ये तत्कालीन केंद्रीय नागरी उड्डयनमंत्री प्रफुल्ल पटेल यांनी या विमानतळाचे आधुनिकीकरण करीत आंतरराष्ट्रीय दर्जाचे विमानतळ सुरू केले. त्यानंतर आता तब्बल ७९ वर्षांच्या कालावधीनंतर केंद्र शासनाच्या उड्डाण योजनेंतर्गत प्रवासी विमान वाहतूक सेवेस प्रारंभ होत आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : तालुक्यातील बिरसी विमानतळावरून प्रवासी वाहतूक सेवेचे उड्डाण होण्याची प्रतीक्षा मागील पंधरा वर्षांपासून जिल्हावासीयांना होती. त्याचीच पूर्तत: आता झाली असून रविवारपासून (दि.१३) प्रवासी विमान वाहतुकीचे टेकऑफ होणार आहे. केंद्रीय नागरी उड्डाणमंत्री ज्योतिरादित्य सिंधिया हे सकाळी ९ वाजता इंदूर येथून हिरवी झेंडी दाखवून विमानसेवेचा प्रारंभ करणार आहेत. गोंदिया-इंदूर-हैदराबाद या सेवेला रविवारपासून नियमित प्रारंभ होत असल्याने जिल्हावासीयांच्या स्वप्नांची पूर्तता झाली आहे. तत्कालीन केंद्रीय विमान वाहतूकमंत्री प्रफुल्ल पटेल यांनी गोंदिया जिल्ह्याच्या भविष्याचा विचार करून तालुक्यातील बिरसी येथील इंग्रजकालीन विमानतळाला नवीन स्वरूप देत त्याचे अत्याधुनिकीकरण केले. आंतरराष्ट्रीय  दर्जाचे  विमानतळ तयार करून त्या ठिकाणी नाइट लँडिंगची व्यवस्था केली. याच धावपट्टीवरून रविवारपासून प्रवासी विमान वाहतूक सेवा सुरू होत असून जिल्हावासीयांसाठी निश्चितच गौरवाची बाब आहे. बिरसी येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे विमानतळ झाल्याने प्रवासी विमान वाहतूक सेवेला प्रारंभ करणे शक्य झाले आहे. त्यावेळी या प्रकल्पाला काहींनी विरोधसुद्धा केला होता; पण खा. पटेल यांनी याला  न जुमानता आपल्या निर्णयावर ठाम राहत आंतरराष्ट्रीय दर्जाच्या विमानतळाची उभारणी केली. अन्यथा या विमानतळावरून प्रवासी विमान वाहतूक सेवेचा प्रारंभ करण्याचे स्वप्न पूर्ण झाले नसते ही बाबदेखील तेवढीच सत्य आहे. या विमानसेवेचा लाभ महाराष्ट्रासह लगतच्या मध्य प्रदेश, छत्तीसगड या राज्यातील प्रवाशांना सुद्धा होणार आहे. शेतीविषयक मालाची वाहतूक करण्यास या सेवेची भविष्यात मदत होणार आहे. ७९ वर्षांनतर झाली स्वप्नपूर्ती गोंदिया तालुक्यातील बिरसी येथील विमानतळाची उभारणी ब्रिटिश सरकारने दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान १९४२-४३ मध्ये केली होती. त्यानंतर २००५ मध्ये तत्कालीन केंद्रीय नागरी उड्डयनमंत्री प्रफुल्ल पटेल यांनी या विमानतळाचे आधुनिकीकरण करीत आंतरराष्ट्रीय दर्जाचे विमानतळ सुरू केले. त्यानंतर आता तब्बल ७९ वर्षांच्या कालावधीनंतर केंद्र शासनाच्या उड्डाण योजनेंतर्गत प्रवासी विमान वाहतूक सेवेस प्रारंभ होत आहे. असे राहणार वेळापत्रकइंदूर विमानतळावरून सकाळी ९.३० सुटेल आणि गोंदिया विमानतळावर सकाळी १०.४५ वाजता पोहोचेल. तर हैदराबादसाठी १ वाजता उड्डाण भरले. त्यानंतर सोमवारपासून नियमित वेळापत्रकानुसार इंदूर-गोंदिया-हैदराबाद अशी विमान सेवा सुरू राहणार असल्याचे फ्लॉय बिग कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. 

बिरसी येथे भविष्याचा विचार करून आंतरराष्ट्रीय दर्जाचे विमानतळ तयार केले होते. या विमानतळावर नाइट लँडिंगसह सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आले. तसेच येथे पायलट प्रशिक्षण केंद्रदेखील सुरू आहे. याच विमानतळावरून आता प्रवासी विमान वाहतूक सेवा सुरू होत असल्याचा निश्चित आनंद आहे.- प्रफुल्ल पटेल, खासदारबिरसी विमानतळावरून प्रवासी विमान वाहतूक सेवेला प्रारंभ व्हावा यासाठी मागील दोन वर्षांपासून केंद्रीय नागरी उड्डयन मंत्रालयाकडे पाठपुरावा सुरू ठेवला होता. त्याचेच आता फलित झाले आहे.- सुनील मेंढे, खासदारबिरसी विमानतळावरून प्रवासी विमान वाहतूक सेवेला प्रारंभ होत असल्याची बाब निश्चितच जिल्हावासीयांसाठी आनंदाची आहे. यामुळे जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळण्यास मदत होईल.- विनोद अग्रवाल, आमदार

 

टॅग्स :Airportविमानतळ