शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2018 23:49 IST

अंगणवाडी सेविका व मदतनिस यांना १८ हजार रुपये मानधन देण्यात यावे, यासह विविध मागण्यांना घेवून अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी मंगळवारी (दि.११) दुपारी १ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा पोहचल्यानंतर मोर्चेकऱ्यांनी त्या ठिकाणी निदर्शने केली.

ठळक मुद्देजिल्हाधिकारी व मुकाअ यांना दिले निवेदन : १८ हजार रूपये मानधन द्या

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : अंगणवाडी सेविका व मदतनिस यांना १८ हजार रुपये मानधन देण्यात यावे, यासह विविध मागण्यांना घेवून अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी मंगळवारी (दि.११) दुपारी १ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा पोहचल्यानंतर मोर्चेकऱ्यांनी त्या ठिकाणी निदर्शने केली.या वेळी विविध मागण्यांचे निवेदन शिष्टमंडळाच्या वतीने जिल्हाधिकारी व जि.प.मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांना देण्यात आले. येथील जयस्तंभ चौकातून दुपारी १ वाजता मोर्चाला सुरूवात झाली. मोर्चात जिल्हाभरातील सर्व अंगणवाडी सेविका व मदतनिस सहभागी झाल्या होत्या. मोर्चात सहभागी अंगणवाडी सेविकांनी शासनाच्या धोरणावर जोरदार टिका केली. यानंतर मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहचला.या ठिकाणी अंगणवाडी सेविकांनी निदर्शने केली. त्यानंतर विविध मागण्यांचे निवेदन शिष्टमंडळाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. निवेदनातून केंद्र शासनाने जाहीर केलेल्या मानधनातील वाढ १ आॅक्टोबरपासून एरियससहित देण्यात यावी, अंगणवाडी कर्मचाऱ्यांना किमान वेतन लागू करावे, किमान १८ हजार रुपये मासीक वेतन द्यावे, सेवानिवृत्त अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना ३ हजार रुपये मासिक पेंशनचा कायदा करण्यात यावा, ९८ लाभार्थ्यांना एकमुस्त सेवानिवृत्ती लाभाचे चार वर्षापासून एक रक्कमी लाभ जिल्हा परिषद महिला बालकल्याणच्या हलगर्जीपणामुळे मिळाला नाही. याची चौकशी करुन योग्य कार्यवाही करावी.भाऊबिजची रक्कम अद्यापही सडक-अर्जुनी देवरी, गोंदिया प्रकल्पात मिळाली नाही, ती देण्यात यावी, गोरेगाव प्रकल्पात मार्च २०१८ चे मानधन मिळाले नाही ते देण्यात यावे. प्रवास भत्याची थकित रक्कम व देवरी प्रकल्पामध्ये २०१३ पासून देण्यात आली नाही.ती त्वरीत देण्यात यावी, आदी मागण्यांचा समावेश होता. शिष्टमंडळात आयटकचे जिल्हा कार्याध्यक्ष हौसलाल रहांगडाले, जिल्हाध्यक्ष शकुंतला फटिंग, जिल्हा सचिव आम्रकला डोंगरे, जिल्हा कोषाध्यक्ष जिवनकला वैद्य, जिल्हा उपाध्यक्ष विणा गौतम, विजया डोंगरे,राजलक्ष्मी हरिणखेडे, जिल्हा सहसचिव ब्रिजुला तिडके, कांचन शहारे,सुनिता मलगाम, जिल्हा संगठन लालेश्वरी शरणागत, विठा पवार, अंजना ठाकरे, पोर्णिमा चुटे,भुमेश्वरी रहांगडाले,ज्योती लिल्हारे, वच्छला भोंगाडे, मीनाक्षी पटले यांचा समावेश होता.

टॅग्स :Morchaमोर्चाcollectorजिल्हाधिकारी