शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

खाद्यतेलाचा वारंवार वापर हा तर गुन्हा ; हाेऊ शकतो कॅन्सर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:30 IST

नरेश रहिले गोंदिया : आपण हॉटेल चालक असाल तर ग्राहकांच्या आरोग्याची काळजी घ्या. स्वत:च्या फायद्यासाठी वारंवार तेच तेल वापरू ...

नरेश रहिले

गोंदिया : आपण हॉटेल चालक असाल तर ग्राहकांच्या आरोग्याची काळजी घ्या. स्वत:च्या फायद्यासाठी वारंवार तेच तेल वापरू नये अन्यथा आपण ग्राहकांना कर्करोगाच्या मुखात टाकाल. आपला व्यवसाय करताना ग्राहकांना वेठीस धरू नका, अन्यथा आपल्याला कारवाईस सामोरे जावे लागेल. गोंदिया जिल्ह्यात असलेल्या २०० हॉटेलांत पदार्थ तळण्यासाठी वारंवार तेच तेल वापरले जात असेल तर अशा हॉटेल चालकांवर आता अन्न व औषध प्रशासन विभाग कारवाई होणे अटळ आहे.

हॉटेलात तळीव पदार्थांसाठी वापरणारे तेल वारंवार वापरले जाते. ते तेल २५ पोलार युनिटच्या वर वापरू नये, अशा सूचना असतानाही हॉटेल चालकांकडून काळेकुट्ट तेल होईपर्यंत वापरले जाते. या तेलातून तळलेले पदार्थ सेवन केल्यास ग्राहकांना कर्करोगासारख्या आजाराला सामोर जावे लागू शकते. ‘रियूज कुकिंग ऑईल’ वापरणाऱ्यांवर मात्र आतापर्यंत एकही कारवाई झाली नाही. गोंदिया शहरात अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी गोंदियात तपासणी केली. परंतु या तपासणीत काहीच निष्पन्न झाले नाही. या अधिकाऱ्यांनी अचानक धाड घातल्यास मोठ्या प्रमाणात होत असलेले रियूज तेल अधिकाऱ्यांना सापडेल.

.............

तेलाचा पुनर्वापर आरोग्याला घातक

समोसा, कचोरी व तेलात तळले जाणारे इतर पदार्थ यासाठी वारंवार त्याच तेलाचा वापर होऊ नये, तेलाचा पोलार युनिट २५ पर्यंतच वापरण्याची परवानगी शासनाने दिली आहे. त्यापेक्षा जास्त तेल वापरले गेले तर त्या हॉटेल चालकांना कारवाईस सामोरे जावे लागणार आहे. परंतु गोंदिया जिल्ह्यातील अनेक हॉटेलात रियूज तेल वापरले जाते. ते आरोग्याला घातक आहे.

....................

रस्त्यावर न खाल्लेले बरे...

१) रस्त्यावर असलेल्या हॉटेलात वापरण्यात येणारे तेल अनेकवेळा वापरले जाते. त्या तेलातून तळलेल्या तेलातून पुन्हा तळलेले पदार्थ सेवन केल्यास कर्करोग होऊ शकतो.

२) रस्त्यावर असलेल्या हॉटेलातील पदार्थांची पाहिजे तेवढी काळजी घेतली जात नाही. रस्त्यावरून धावणाऱ्या वाहनांची धूळ त्या पदार्थांवर बसते.

३) रस्त्यावर असलेले तळलेले पदार्थ सेवन केल्यास अनेक आजाराला सामोरे जावे लागू शकते. त्या पदार्थांवर माशा बसतात. शिळे पदार्थही तळून विक्रीला ठेवलेले असतात.

........................

हॉटेल व फरसान दुकाने चालकांनी वारंवार तेच तेल वापरू नये, अन्यथा त्यांना कारवाईला सामोरे जावे लागेल. ज्या हॉटेलात ५० लिटरपेक्षा अधिक तेलाची गरज पडते, अशा हॉटेलांतील तपासण्या आधी करण्यात येत आहेत. नियम तोडल्यास कारवाईस सामोरे जावे लागेल.

- अभय देशपांडे, सहायक आयुक्त

अन्न व प्रशासन विभाग, गोंदिया,भंडारा.

.....................

अहो, आश्चर्यम् एकावरही कारवाई नाही

१) हॉटेलात तळीव पदार्थांसाठी वापरणारे तेल वारंवार वापरले जाते. ते तेल २५ पोलार युनिटच्या वर वापरू नये, अशा सूचना असतानाही हॉटेल चालकांकडून काळेकुट्ट तेल होईपर्यंत वापरले जाते.

२) या तेलातून तळलेले पदार्थ सेवन केल्यास ग्राहकांना कर्करोगासारख्या आजाराला सामोर जावे लागू शकते. परंतु गोंदिया जिल्ह्यात रियूज कुकिंगची एकही कारवाई करण्यात आली नाही.

.............

डॉक्टरांचा सल्ला

१) शक्यतो बाहेरचे खाणे टाळावे, घरातील पदार्थ शुद्ध असतात. स्वत: बनविलेल्या पदार्थांची खात्री १०० टक्के असते. बाहेरचे खाल्ल्याने व्यक्तीला विविध आजारांना बळी पडावे लागू शकते.

- डॉ. संजय देशमुख, गोंदिया (साखरीटोला)

....

२) बाहेरचे खाल्ल्याने ते पदार्थ शिळे आहे किंवा वारंवार त्याच तेलातून तळून ठेवण्यात आले आहे हे कुणाला ठाऊक नसते. अनेक लोक पैशाच्या हव्यासापायी आरोग्याची पर्वा न करता ग्राहकांशी खेळ करीत आहेत. त्यामुळे शक्यतो घरातीलच खावे.

- डॉ. शैलेश भसे, सालेकसा