शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

प्रवाशांना मोफत वाय-फाय सुविधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2017 00:37 IST

मागील तीन वर्षात गोंदिया रेल्वे स्थानकाचा चांगला विकास झाला. आता रेल्वे स्थानकाच्या सौंदर्यीकरणाचे काम सुरू असून त्यात भर म्हणून प्रवाशांसाठी नागपूर रेल्वे स्थानकाप्रमाणे नि:शुल्क वाय-फाय सेवेची सुविधा ...

ठळक मुद्देगोंदिया रेल्वे स्थानक : विकास कामांमध्ये पडतेय भर

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : मागील तीन वर्षात गोंदिया रेल्वे स्थानकाचा चांगला विकास झाला. आता रेल्वे स्थानकाच्या सौंदर्यीकरणाचे काम सुरू असून त्यात भर म्हणून प्रवाशांसाठी नागपूर रेल्वे स्थानकाप्रमाणे नि:शुल्क वाय-फाय सेवेची सुविधा उपलब्ध करुन दिली जाणार आहे.सद्यस्थितीत गोंदिया रेल्वे स्थानकावर वाय-फायच्या सुविधेची टेस्टिंग केली जात आहे. संपूर्ण स्थानकात लवकरच वाय-फाय सुरू होणार आहे. यासाठी प्रवाशांना आपला डेटा बंद करून वाय-फायने कनेक्ट केल्यावर एक ओटीपी येईल, त्या क्रमांकाने प्रवासी या सेवेचा उपयोग करू शकतील.सदर रेल्वे स्थानकाच्या विकासात आणखी भरच पडणार आहे. काही वर्षांपूर्वी गोंदिया रेल्वे स्थानकाच्या होमप्लॅटफॉर्मवर विस्तीर्ण अशा शेडचे बांधकाम, लिफ्ट आणि स्वयंचलित पायºयांच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले होते.यापैकी शेड बांधकाम व दोन फलाटांवर लिफ्टचे काम पूर्ण होवून त्याचे लोकार्पणही करण्यात आले. सद्यस्थितीत प्लॅटफॉर्म-२ वर आणखी एका लिफ्टचे काम सुरू आहे. याचा लाभ दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांना मिळत आहे. शिवाय आता याच फलाटावर रॅम्पचे काम व फलाटाची लांबी वाढविण्याचे काम सुरू आहे. सदर दोन्ही कामे लवकरच पूर्णत्व: जाणार असल्याची माहिती अधिकाºयांनी दिली.होमप्लॅटफॉर्मवर एस्कलेटरचे काम आॅगस्ट महिन्यातच पूर्ण झाले आहे. काही दिवसांपूर्वी एस्कलेटरची टेस्टिंगही करण्यात आली. मात्र या सेवेचे अद्याप लोकार्पण करण्यात आले नाही. प्लॅटफॉर्म-२ वरील रॅम्प, लिफ्ट व होम प्लॅटफॉर्मवरील एस्कलेटर या तिन्ही सेवांचे एकत्रच लोकार्पण करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.आॅटोमेटिक तिकीट व्हेंडर मशिनच्या सुविधेसह आता त्याच प्रकारातील आॅटोमेटिक क्वॉईन आॅपरेटेड वॉटर व्हेंडर मशिनची सुविधा प्रवाशांसाठी उपलब्ध करुन देणार असल्याचे अधिकाºयांनी सांगितले.तिरोडा रेल्वे स्थानक विकासापासून दूरअदानी पॉवर प्लांटसारखा मेगाप्रोजेक्ट तिरोडा येथे असतानाही तेथील रेल्वे स्थानकाचा अद्यापही विकास झालेला नाही. मागील दोन वर्षांपासून तेथे इलेक्ट्रॉनिक उद्घोषणा यंत्र धूळ खात पडून आहे. सदर यंत्र अद्यापही संचालित करण्यात आले नाही. या स्थानकावर इलेक्ट्रॉनिक डिस्प्ले बोर्ड नसल्याने रात्रीच्या वेळी प्रवाशांना आपल्या डब्यात जाण्यासाठी मोठीच कसरत करावी लागते. नागरिकांची दुसºया फूटओव्हर ब्रिजची मागणी अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे. तसेच फलाटांवर योग्य प्रमाणात खुर्च्यांची सोय नाही. शिवाय फलाटांवर छताचा अभाव असल्याने उन्हाळा व पावसाळ्यात प्रवाशांची मोठीच फजिती होते.