शहरं
Join us  
Trending Stories
1
२०१४ मध्येच भाजपा शिवसेनेला हात दाखवणार होती,पण...; प्रफुल्ल पटेलांचा १० वर्षांनी गौप्यस्फोट
2
Mumbai Rain: 'गो अराऊंड'चा मेसेज आणि 9 विमानांच्या मुंबई विमानतळावर बराच वेळ घिरट्या
3
'अलास्का' इथं डोनाल्ड ट्रम्पच्या भेटीला पोहचले डुप्लिकेट पुतिन; सोशल मीडियात चर्चांना उधाण, कारण...
4
गुंतवणूकदार होणार मालामाल! 'ही' ऑटोमोबाईल कंपनी देणार प्रति शेअर १०० रुपये लाभांश, तुम्हालाही संधी?
5
मोठी नाचक्की...! ऑपरेशन सिंदूरवेळी कराची बंदरातून पाकिस्तानी नौदल पळून गेलेले; कुठे लपलेले...
6
Russia-Ukraine War : एकीकडे शांतता चर्चा, दुसरीकडे बॉम्ब वर्षाव: झेलेन्स्की अमेरिकेत असताना रशियाने युक्रेनला हादरवले!
7
Russia Ukrain War : डोनाल्ड ट्रम्प युक्रेनचे दोन तुकडे करणार? क्रिमिया अन् दोन मोठी शहरे रशियाला मिळणार
8
तरुण वयात ₹१०० ची बचत वृद्धापकाळात देऊ शकते ३ कोटींची रक्कम; SIP मध्ये गुंतवणुकीसाठी वापरू शकता 'हा' फॉर्म्युला
9
दहावीतील विद्यार्थ्याची नववीतील विद्यार्थ्याने केली हत्या, चाकूने सपासप वार केले आणि...  
10
Mumbai Local: मुंबईत मुसळधार पाऊस! हार्बर आणि मध्य मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत
11
आभाळ फाटले! मुखेड तालुक्यातील सहा गावांत पाणी शिरले; बेपत्ता १२ जणांचा शोध सुरु
12
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
13
परळी हादरलं! लग्नावरून परतताना जीप पुरात वाहून गेली; तिघे बचावले, एकाचा मृत्यू
14
School Holiday: मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी
15
Video: टोलनाक्यावरील कर्मचारी की गुंड; लष्कराच्या जवानावर तुटून पडले, खांबाला बांधून दांडक्याने मारले
16
चेकच्या मागच्या बाजूला सही का करतात? ९०% लोकांना या प्रश्नाचे उत्तर माहित नसणार
17
‘मत चोरी’चा वाद वाढला, विरोधक मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याच्या तयारीत 
18
Technology: ATM मधून पैसे काढल्यानंतर तुमचा PIN सुरक्षित राहतो का? 'अशी' घ्या काळजी!
19
Asia Cup India Squad : गंभीरनं 'फिल्डिंग' लावली तर गिल खेळणार; नाहीतर... आगरकर हे ३ मोठे निर्णय घेणार?
20
धक्कादायक! रणथंभोर व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांची गाडी अचानक पडली बंद आणि मग...

अंडरग्राउंड, एबी केबलचा मार्ग मोकळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2017 21:38 IST

वीज चोरीच्या घटनांवर आळा घालण्यासाठी महाराष्ट्र वीज वितरण कंपनी आता अंडरग्राऊंड (भूमिगत) व एबी (एरीयल बंच) केबलने वीज पुरवठा करणार आहे.

ठळक मुद्देएकात्मिक ऊर्जा विकास योजना : गोंदिया व तिरोडा शहराची निवड, कार्यादेश देण्यात आले

कपिल केकत।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : वीज चोरीच्या घटनांवर आळा घालण्यासाठी महाराष्ट्र वीज वितरण कंपनी आता अंडरग्राऊंड (भूमिगत) व एबी (एरीयल बंच) केबलने वीज पुरवठा करणार आहे. यासाठी केंद्र शासनाच्या एकात्मिक उर्जा विकास योजनेंतर्गत (आयपीडीएस) जिल्ह्याला २८.२० कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे.जिल्हयातील गोंदिया व तिरोडा या दोन शहरांची निवड करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत उच्च व लघुदाब वाहिन्या (केबल) टाकल्या जाणार असून दोन टप्यात विभाजण्यात आलेल्या या योजनेसाठी कंत्राटदारांना कार्यादेश देण्यात आले आहेत. जिल्ह्यात वीज चोरीचे प्रमाण वाढले असून वीज चोरी पकडण्यासाठी किंवा थकबाकीची वसूली करण्यासाठी गेलेल्या कर्मचाºयांना मारहाण व शिवीगाळ करण्याच्या घटनांमध्ये अलीकडे वाढ झाली आहे. शिवाय मनुष्यबळाची कमतरता यामुळे दैनंदिन कामात महावितरण कोठेतरी कमी पडत आहे. परिणामी वीज चोरीच्या घटनांवर आळा पूर्णपणे यशस्वी झालेले नाही. यामध्ये आकडा टाकून वीज चोरी ही उघड बाब आहे. वीज चोरीच्या या प्रकारांवर आळा घालण्यासाठी आता महावितरणने कठोर पाऊले उचलली आहे. वीज चोरीच्या घटनांवर घालण्यासाठी व उघड्यावर वीज पुरवठा करणाºया वाहिन्यांमुळे अपघात होऊ नये, यासाठी सुरक्षेच्या दृष्टीने महावितरणने वेगळी पाऊले उचलली आहे. महावितरण आता अंडरग्राऊंड (भूमिगत) केबल टाकणार आहे. शिवाय ज्या ठिकाणी अंडरग्राउंड केबल टाकता येणार नाही, अशा भागांत एबी केबलच्या (एरियल बंच) माध्यमातून वीज पुरवठा करणार आहे. केंद्र शासनाच्या एकात्मिक ऊर्जा विकास योजनेंतर्गत जिल्ह्यातील गोंदिया व तिरोडा या दोन शहरांची निवड केली आहे. यात गोंदियासाठी १८ कोटी ३८ लाख तर तिरोड्यासाठी नऊ कोटी ८२ लाख अशी एकूण २८ कोटी २० लाख रूपयांची तरतूद केली आहे.निविदेला ८ वेळा मुदतवाढया योजनेंतर्गत तीन उपकेंद्र त्यासाठी लागणारी उच्चदाब वाहिनी, उपकेंदातून निघणारी वाहिनी, उपकेंद्र क्षमतावाढ आदि कामे मुख्य कार्यालयाच्या अखत्यारीत येतात. तर एरीयल बंच केबल व लघुदाब वाहिनीची कामे परिमंडळस्तरावर असल्याने योजना भाग - १ व भाग-२ अशा दोन भागांत विभागण्यात आली आहे. यासाठी महावितरणने निविदा काढली. मात्र निविदेला प्रतिसाद मिळत नसल्याने सलग ८ वेळा मुदतवाढ द्यावी लागली. त्यानंतर आता ९ व्या वेळेत प्रतिसाद मिळाल्याने कंत्राटदारांना एप्रिल महिन्यात कार्यादेश देण्यात आले असून येत्या दिड वर्षात त्यांना हे काम पूण करायचे आहे.उच्चदाब व लघुदाब वाहिनी टाकणारया योजनेंतर्गत उच्चदाब वाहिनीसाठी गोंदिया शहरात ४ किमी. तर तिरोडा शहरात ३ किमी. चे नियोजन करण्यात आले आहे. तर लघुदाब वाहिनीसाठी अंडरग्राऊंड अंतर्गत गोंदियात १० किलोमीटरचे नियोजन करण्यात आले आहे. यात तिरोडा शहरात लघुदाब वाहिनी सध्यातरी टाकली जाणार नाही. तर जेथे शक्य होणार नाही अशा भागांत एरीयल बंच केबल टाकले जाणार आहे. यासाठी गोंदियात १४ किलोमीटरचे नियोजन करण्यात आले आहे.गोंदिया शहरात माताटोली व रिंगरोड तर तिरोडात चुरडी रोड असे तीन नवे उपकेंद्र (सबस्टेशन) तयार केले जाणार आहेत. तसेच पार्वतीघाट, भिमघाट व सुर्याटोला उपकेंद्रांची क्षमता वाढ केली जाणार आहे.काय आहे अंडरग्राऊंड व एबी केबलअंडरग्राऊंड (भूमिगत) व एबी केबल ही दोन कामे महावितरण करणार आहे. यात अंडरग्राऊंड केबल अंतर्गत गोंदियात चार किलोमीटर व तिरोडात ती किलोमीटर उच्चदाब भूमिगत वाहिनी व १० किलोमीटर लघुदाच भूमिगत वाहिनी गोंदियात टाकली जाणार आहे. अंडरग्राऊंड केबलमध्ये जमिनीच्या आतून केबल टाकले जाणार आहे. जेणेकरून आकडा घालण्याचा प्रकार बंद होऊन कुणालाही वीज चोरी करता येणार नाही. तसेच एबी केबल म्हणजे हे विशिष्ट प्रकारचे केबल आहे. या केबलच्या आत मध्ये वीज पुरवठा करणारे तार राहणार असून त्यावर कोट राहणार.या भागात टाकले जाणार केबललघुदाब वाहिनी (अंडरग्राऊंड)जयस्तंभ चौक - चांदनी चौकगांधी प्रतिमा - रेल्वे स्टेशनकुडवा रोड - मटन मार्केटदुर्गा चौक - इंदिरा गांधी स्टेडियमश्री टॉकीज - जैन फर्निचरपोलीस स्टेशन - सब्जी मंडी व जयस्तंभ चौकएरीयर केबल बंचभिमनगर४ संजयनगररामनगर बाजार चौकमोक्षधाम मार्ग