गोंदिया: विक्री केलेल्या तांदळाची रक्कम न देता उलट ३१ लाख १७ हजार ४०८ रुपयांची मागणी करणाऱ्या पुणे येथील टीजीए प्रायव्हेट लिमीटेड कंपनीच्या संचालकासह सात जणांवर न्यायालयाच्या आदेशावरून गोंदिया शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. गोंदियाच्या सिंधी कॉलोनी येथील राकेश दयालदास कारडा (३५) या व्यापाऱ्यांने १३ जून २०१३ रोजी १ हजार २५० क्विंटल तांदूळ खरेदी करून मुंबई येथे पाठविले. त्या तांदळाची बिलामध्ये असलेल्या चुका दुरूस्त करून ते बिल कंपनीला इमेल केले. परंतु आरोपींनी त्यांना या तांदळाचे पैसे न देता बोगस दस्तावेज तयार करून उलट त्यांच्यावर ३१ लाख १७ हजार ४०८ रुपये काढले व त्या पैश्याची मागणी केली. हे प्रकरण राकेश कारडा यांनी न्यायालयात टाकले. न्यायालयाच्या आदेशावरून पुणे येथील सात जणांवर गुन्हा दाखल केला आहे. पियुष चतुर्भूज गर्ग रा. प्रियंका रेन्सीडेन्सी मोहीम तारा हॉस्पीटल समोर सोलापूर हायवे हडपसर पुणे, चतुर्भूज गर्ग रा. प्रियंका रेन्सीडेन्सी मोहीम तारा हॉस्पीटल समोर सोलापूर हायवे हडपसर पुणे, टी.जे.ए. टेनलीक प्रायव्हेट लिमीटेड रा. ६०४ मेट्रीक कारपोरेट रोड प्रल्हादनगर दिव्यभास्करच्या मागे अहमदाबाद, हेतल गुंजन बिरासरीया रा. अहमदाबाद, गुंजन भगवतीप्रसाद बिरासरीया रा. अहमदाबाद, विना कमलेश गलानी व मुकेश सच्चानंद उर्फ सच्चू नेहलानी रा. अहमदाबाद यांच्यावर गुन्हे दाखल केले.त्यांच्यावर भादंविच्या कलम ४१६, ४१७, ४१९, ४२०, ४६५, ४६७, ४६८, १०९, ११४, ४०६, ४७१, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. (तालुका प्रतिनिधी)
तांदळाच्या व्यापाऱ्याची फसवणूक
By admin | Updated: October 8, 2014 23:28 IST