शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

चौघांनी केले विष प्राशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2018 21:39 IST

विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न करण्याच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. मागील २४ तासांत चार व्यक्तींनी विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यांना उपचारासाठी वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आल्याने सदर माहिती समोर आली आहे.

ठळक मुद्दे२४ तासांतील घटना : वैद्यकीय महाविद्यालयात भर्ती

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न करण्याच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. मागील २४ तासांत चार व्यक्तींनी विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यांना उपचारासाठी वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आल्याने सदर माहिती समोर आली आहे.यात, गोरेगाव तालुक्यातील ग्राम पालेवाडा येथील रहिवासी ललिता तुळशीराम ताराम (४०) या महिलेने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. तिला गोरेगावच्या ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. मात्र तिची गंभीर प्रकृती पाहून तिला वैद्यकीय महाविद्यालयात शनिवारी रात्री हलविण्यात आले.तर ग्राम तेढा येथील रहिवासी दिनेश तिलकचंद मस्के (३०) यानेसुद्धा विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यालाही शनिवारी रात्री गोरेगावच्या ग्रामीण रूग्णालयातून वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्यात आले.तसेच ग्राम डोंगरगाव येथील रहिवासी गोमता शांतीलाल हरिणखेडे (२०) व रावणवाडी पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या ग्राम सावरी येथील रहिवासी सुनील नत्थुलाल चौधरी (२३) यांनीसुद्धा विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यांना रविवारी सकाळी वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून या चौघांवर उपचार सुरू होते.