शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

चार वर्षांपासून तलाठी साज्यांचे भाडे प्रलंबित

By admin | Updated: October 13, 2016 01:49 IST

गावस्तरावर महसूल विभागाची सर्वच कामे तलाठी साज्यांमधून होतात. गावागावात तलाठ्यांचे कार्यालय म्हणून ग्रामस्थांच्या घरी भाड्याने हे साजे चालतात.

तिरोडा तालुका : तलाठ्यांच्या खिशांवर पडतोय भुर्दंडगोंदिया : गावस्तरावर महसूल विभागाची सर्वच कामे तलाठी साज्यांमधून होतात. गावागावात तलाठ्यांचे कार्यालय म्हणून ग्रामस्थांच्या घरी भाड्याने हे साजे चालतात. मात्र शासनाच्या दुर्लक्षित धोरणांमुळे तिरोडा तालुक्यातील तलाठी साज्यांचे भाडे मागील चार वर्षांपासून देण्यात आले नाही. याचा आर्थिक ओझा तलाठ्यांना सहन करावा लागत आहे.तिरोडा तहसील कार्यालयांतर्गत एकूण ३३ तलाठी साजे आहेत. जवळपास सर्वच साजे भाड्यावर आहेत. या ३३ साज्यांमध्ये ३० तलाठी कार्यरत असून तीन तलाठी निलंबित असल्याचे सांगण्यात आले आहे. एका साज्यांतर्गत तीन ते चार गावांचा समावेश असतो. शिवाय पदभरती न झाल्याने किंवा निलंबनाच्या कारवाईमुळे एखाद्या साज्यात तलाठी नसला तर जवळच्या साज्यातील तलाठ्यावर त्या साज्याचा भार सोपविला जातो. त्यामुळे क्षेत्र वाढल्याने तलाठ्यावर कामाचा भारही वाढतो. अशावेळी शासनाकडून तलाठी साज्याचे भाडेच उपलब्ध झाले नाही तर तलाठ्यांना स्वत:च्या खिशातून भाडे देण्याचा प्रसंग येतो. असाच प्रकार तिरोडा तालुक्यात सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे. तिरोडा तहसील कार्यालयांतर्गत येणाऱ्या साज्यांचे भाडे सन २०१२ पासून आतापर्यंत देण्यात आले नाही. या कालावधीत केवळ जुलै २०१३ व आॅगस्ट २०१३ या दोनच महिन्यांचे भाडे देण्यात आले आहेत. उर्वरित चार वर्षांतील इतर महिन्यांचे भाडे अद्यापही शासनाकडून उपलब्ध न झाल्याने संबंधित तलाठ्यांवर आर्थिक भार पडत असल्याचे संबंधितांनी सांगितले आहे. महसूल विभाग महसूल गोळा करून शासनाला पुरवठा करतो. मात्र महसुलाचे काम चालणाऱ्या गावस्तरावरील कार्यालयांचे भाडे देण्याकडेच शासनाचे दुर्लक्ष आहे. अनेकदा पाठपुरावा करूनही साज्याचे भाडे काढण्यात आले नाही. त्यामुळे तलाठ्यांना संबंधित खोलीच्या मालकाचे बोलणे ऐकावे लागत असल्याचे काही तलाठ्यांनी सांगितले आहे.(प्रतिनिधी)