शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

लोखंडी सळ्यांसह गुन्ह्यातील चारचाकी वाहनही जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:27 IST

गोंदिया : लोखंडी सळ्या घेऊन नागपूरला जात असलेल्या ट्रक चालकाला मारहाण करून, त्याच्यासह ट्रक पळवून सळ्या काढून चालक व ...

गोंदिया : लोखंडी सळ्या घेऊन नागपूरला जात असलेल्या ट्रक चालकाला मारहाण करून, त्याच्यासह ट्रक पळवून सळ्या काढून चालक व ट्रकला नागभिड येथे सोडण्यात आले होते. देवरी पोलीस ठाण्यांतर्गत महामागार्वर २८ फेब्रुवारी घडलेल्या या घटनेत पोलिसांनी ७ जणांच्या टोळीला जेरबंद केले आहे. लोखंडी सळ्या व गुन्ह्यात वापरलेले चारचाकी वाहनही जप्त केले आहे.

प्राप्त माहितीनुसार, ट्रक चालक फिर्यादी प्रवीण रामभाऊ धांडे (रा.मानकापूर, नागपूर) हे ट्रक क्रमांक सीजी ०७-सीए ३४०० मध्ये रायपूर येथून १२ लाख ४५ हजार ६३३ रुपये किमतीच्या २५ टन ४० किलो वजनाच्या लोखंडी सळ्या घेऊन २८ फेब्रुवारी रोजी नागपूरला जात होते. मात्र, देवरी येथे महामार्गावर पांढऱ्या रंगाच्या चारचाकी वाहनात आलेल्या ७ जणांनी त्यांना मारहाण करून व हातपाय व डोळ्याला पट्टी बांधून ट्रक पळून नेला होता. त्यानंतर, आरोपींनी ट्रकमधील सळ्या अन्यत्र काढून धांडे यांना ट्रकसह चंद्रपूर जिल्ह्यातील नागभिड-नागपूर मार्गावरील नवखडा गावाजवळ सोडून दिले होते. प्रकरणी नागभिड पोलीस ठाणे व देवरी पोलीस ठाण्यात भादंविच्या कलम ३४१, ३९५ अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला होता. या प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेने पथक तयार करून भंडारा, नागपूर व नागभिड येथे जाऊन तपास सुरू केला असता, नागपूर येथील इसम पप्पू हसन (रा.डोंगरगाव,हिंगणा) हा आपल्या साथीदारांसह अशा प्रकारचे गुन्हे करीत असल्याची माहिती त्यांच्या हाती लागली. यावर पथकाने पप्पू हसनला ताब्यात घेतले. विचारपूस केली असता, त्याने आपल्या ७ साथीदारांसह हा गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यानुसार, पोलिसांनी त्याच्या साथीदारांना ताब्यात घेतले व विचारपूस केली असता, त्यांनी कबुली देत, लोखंडी सळ्या कोठे ठेवल्या आहेत, याचीही माहिती दिली. त्यानुसार, पथकाने नागपूर येथे जाऊन ग्राम सोंडपार येथील महामार्गापासून दूर आत कच्च्या रस्त्यावरून लोखंडी सळ्या व गुन्ह्यात वापरलेले चारचाकी वाहन ताब्यात घेतले आहे.

------------------------

या साथीदारांना केली अटक

या प्रकरणात पोलिसांनी शफीर नजीर हसन उर्फ पप्पू हसन (५५) याच्यासोबत हा गुन्हा करणाऱ्या शुभम वासुदेव चक्रवर्ती (३१,रा.नवीन गुमगाव), ऋषभ ज्ञानेश्वर चिरूटकर (१९,रा. नवीन गुमगाव), अरुण देवाजी वरखडे (२२, रा.नवीन गुमगाव), महेंद्र नेवालाल गमधरे (३५, रा.डोंगरगाव), अभिलेख नामदेव गावतुरे (१९,रा. नवीन गुमगाव) व अशोक लक्ष्मण दुधनाग (१९, रा.नवीन गुमगाव) यांना ताब्यात घेऊन अटक केली आहे. न्यायालयाने या आरोपींना सोमवारपर्यंत (दि.८) पोलीस कोठडी सुनावली आहे.