शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
6
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
7
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
8
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
9
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
10
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
11
जीएसबी सेवा मंडळाचा ४७४ कोटींचा विमा; यामध्ये भाविकांचाही समावेश, एसीमध्ये दर्शन मिळणार
12
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
13
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
14
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
15
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
16
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
17
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

डोंगरगडमध्ये आजपासून चार एक्स्प्रेसचा थांबा

By admin | Updated: March 28, 2017 00:46 IST

दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा माता बम्बलेश्वरी मंदिर डोंगरगढ येथे चैत्र वनरात्री पर्वानिमित्त २८ मार्च ते ५ एप्रिल २०१७ पर्यंत डोंगरगढ येथे ...

पाच रेल्वेगाड्यांचे विस्तारीकरण : चैत्र नवरात्रीनिमित्त विशेष सुविधागोंदिया : दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा माता बम्बलेश्वरी मंदिर डोंगरगढ येथे चैत्र वनरात्री पर्वानिमित्त २८ मार्च ते ५ एप्रिल २०१७ पर्यंत डोंगरगढ येथे लाखो श्रद्धाळूंची ये-जा राहणार आहे. त्या दृष्टीने डोंगरगढ स्थानकावर चैत्र उत्सवादरम्यान भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेवून दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वे नागपूर मंडळाद्वारे अतिरिक्त गाड्यांची सोयी करण्यात आली आहे. तसेच उत्सवादरम्यान काही रेल्वेगाड्यांचा डोंगरगढ स्थानकात थांबा व काही गाड्यांचे विस्तारीकरण करण्यात आले आहे. डोंगरगड स्थानकावर गाडी क्रमांक (२१३०/२१२९) हावडा-पुणे-हावडा आझाद हिंद एक्सप्रेस, गाडी (१२८१२/१२८११) हटिया-लोकमान्य तिळक-हटिया, गाडी (१८४७३/१८४७४) पुरी-जोधपूर-पुरी, गाडी (१२९०६/१२९०५) हावडा-पोरबंदर-हावडा या गाडांच्या थांबा अस्थायी स्वरूपात २८ मार्च ते ५ एप्रिल २०१७ पर्यंत दोन मिनिटांसाठी देण्यात आला आहे. याशिवाय गाडी क्रमांक (५८२०८) जुनागड रोड-रायपूर, गाडी (५८२०४) रायपूर-गेवरा रोड, गाडी (५८८१८) तिरोडी-तुमसर तसेच गाडी (५८८१७) तुमसर-तिरोडी या गाड्यांचे सदर कालावधीसाठी डोंगरगढपर्यंत विस्तारीकरण करण्यात आले आहे. तसेच सदर कालावधीसाठी गाडी (६८७४१/६८७४२) दुर्ग-गोंदिया-दुर्ग या गाडीला रायपूरपर्यंत वाढविण्यात आले आहे. चैत्र उत्सवादरम्यान डोंगरगड येथे महाराष्ट्र, मध्य प्रदेश व छत्तीसगड राज्यातून मोठ्या प्रमाणात श्रद्धाळू येतात. रेल्वेगाड्यांच्या सर्वच बोग्या ‘हाऊसफुल्ल’ असतात. शिवाय गर्मीमुळे प्रवाशांना मोठीच गैरसोय होते. रेल्वे प्रशासनाने सदर कालावधीसाठी काही गाड्यांचा अस्थायी थांबा व काही गाड्यांचे विस्तारीकरण डोंगरगडपर्यंत करण्याचा निर्णय घेतला. सदर उत्सवात गर्दीमुळे प्रवाशांना कसल्याही प्रकारची असुविधा होवू नये, यासाठी मंडळद्वारे पाच अतिरिक्त तिकीट काऊंटर, १८ अतिरिक्त बुकिंग कर्मचारी, ३९ तपासणी कर्मचारी, २० रेल्वे सुरक्षा दलाचे जवानांसह स्काऊट-गाईडचे सदस्य तैनात राहणार आहेत. त्यासोबतच स्थानकात अतिरिक्त प्रसाधन, वॉटर बुथ व सहायता केंद्राची सुविधा राहील.