शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षिकेवर सामूहिक अत्याचार करणाऱ्या चार आरोपींना दोन वर्षाचा सश्रम कारवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:32 IST

गोंदिया : लगतच्या मध्य प्रदेश राज्यातील रायसेन येथील ३४ वर्षीय शिक्षिकेवर गोंदियात सामूहिक अत्याचार करणाऱ्या चार नराधमांना जिल्हा सत्र ...

गोंदिया : लगतच्या मध्य प्रदेश राज्यातील रायसेन येथील ३४ वर्षीय शिक्षिकेवर गोंदियात सामूहिक अत्याचार करणाऱ्या चार नराधमांना जिल्हा सत्र न्यायालयाने दोन वर्षांचा सश्रम कारावास सुनावला आहे. आरोपी अभिमन्यू प्राणहंस मडामे (२३), डायमंड ऊर्फ विश्वनाथ डोंगरे (३९, दोन्ही रा. कटंगीटोला), राजेश ऊर्फ मोगली रमेश बन्सोड (१९, रा. इंदिरानगर-कॉलेज टोली, कुडवा) व नरू ऊर्फ परमेश्वर रामलाल बिसेन (२४, रा. तेढवा) असे आरोपींचे नाव आहे. ही सुनावणी मंगळवारी (दि.२१) प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश शब्बीर अहेमद औटी यांनी केली आहे.

रायसेन येथील ३४ वर्षीय शिक्षिका २३ सप्टेंबर २०१२ रोजी रेल्वेच्या जनरल डब्यात बसून भोपाळवरून रायपूर येथे जात असताना त्यांची पैसे असलेली बॅग आरोपींनी पळविली होती. गोंदिया रेल्वेस्थानकावर गाडी येताच बॅगमधील २१ हजार ९०० रूपये चोरून नेणाऱ्या आरोपींनी ती बॅग डोंगरगड रेल्वेस्थानकावर टाकली. पीडित महिला डोंगरगड येथे गेल्यावर फलाटावर त्यांची बॅग दिसल्याने त्यांनी आपली बॅग ओळखून त्या बॅगजवळ गेल्या असता आरोपींनी त्यांना चोरीला गेलेले पैसे मिळवून देतो परंतु त्यासाठी गोंदियाला जावे लागेल असे सांगितले. पैसे मिळविण्यासाठी शिक्षिका आरोपींसोबत त्याच दिवशी सायंकाळी ५ वाजतापर्यंत गोंदिया रेल्वे स्थानकावर आल्या. आरोपींनी त्यांना ऑटो क्रमांक ४८९ मध्ये बसवून अंगुर बगिचा मैदानात नेले. तेथे तिचे तोंड दाबत असताना त्यांनी त्यांच्या तावडीतून पळण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांना पकडून चाकूचा धाक दाखवून चौघांनी आळीपाळीने अत्याचार केला.

पुन्हा रात्रीला त्यांच्यावर अत्याचार करून अंगुरबगिचा येथे असलेल्या एका घरात ठेवले. दुसऱ्या दिवशी नजर चुकवून शिक्षिका पळत गोंदिया रेल्वे स्थानकावर आली. या घटनेची तक्रार आधी गोंदिया रेल्वे पोलिसांत करण्यात आली. मात्र हा गुन्हा रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्याने रामनगर पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला. रामनगर पोलिसांनी भादंविच्या कलम ३६६, ३७६ (जी) ३७९, ३४१ अन्वये गुन्हा दाखल केला होता. न्यायालयाने या प्रकरणात सर्व आरोपींना प्रत्येकी दोन वर्षांचा सश्रम कारावास व ६० हजार रुपये दंड ठोठावला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक रविंद्र शेळके यांनी केला होता. सरकारी वकील म्हणून ॲड. पी.एस. आगाशे व ॲड. कैलास खंडेलवाल यांनी काम बघितले. न्यायालयीन कामकाजासाठी महिला पोलीस शिपाई नमिता लांजेवार यांनी काम बघितले.