गोंदिया : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने रविवारी (दि. ७) घेण्यात आलेल्या सभेत सन २०२१ साठी कार्यकारिणीचे गठन करण्यात आले. राज्य सरचिटणीस विजय कोंबे यांच्या अध्यक्षतेत घेण्यात आलेल्या सभेला राज्य कार्यकारिणी सदस्य महेंद्र भूते व संघटक राजू निभोरकर प्रामुख्याने उपस्थित होते.
सभेत, शिक्षक समिती जिल्हाध्यक्षपदी किशोर डोंगरवार, सरचिटणीस संदीप मेश्राम, कार्याध्यक्ष डी. एच. चौधरी, जिल्हा उपाध्यक्ष जी.ई. येडे, सुरेश कश्यप, गौतम बांते, वाय.आय. रहांगडाले, एम.पी. म्याकलवार, राधेश्याम ठाकरे, भावेश शहारे, नरेश मेश्राम, कोषाध्यक्ष वाय.पी. लांजेवार, प्रसिद्धी प्रमुख कैलाश हांडगे, कार्यालयीन चिटणीस मुकेश रहांगडाले, बी.एस. केसाळे, जिल्हा सहसचिव शरद पटले, टी.पी. शहारे, विशाल कच्छवाह, दिलीप नवखरे, उत्तम गजभिये, भरत भेंडारकर, दीपक कापसे, मुख्य संघटक उमेश रहांगडाले, मिथुन चव्हाण, एस.टी. भालेकर, दिवाकर नागोसे, यू.जी. हरिणखेडे, सी.जे. हेमके, जिल्हा महिला प्रतिनिधी सुनंदा शंभरकर, दीक्षा फुलझेले, अल्का बडवाईक यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. तर लवकरच जिल्हा कार्यकारिणीचा विस्तार केला जाईल, असे जिल्हाध्यक्ष डोंगरवार यांनी सांगितले. सूत्रसंचालन वाय.पी. लांजेवार यांनी केले. आभार संदीप तिडके यांनी मानले. या वेळी राज्य, जिल्हा व तालुका पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.