राजकुमार बडोले : कार्यकर्ता मेळावा
सडक अर्जुनी : येणाऱ्या जि.प. व पं.स. निवडणुकीत कार्यकर्त्यांनी आपापसातील मतभेद विसरून जोमाने कामाला लागावे. येणाऱ्या जि.प.व पं.स. निवडणुकीत पक्ष ज्या कार्यकर्त्यांला तिकीट देईल त्यासाठी आपण इमानेइतबारे काम करावे. जि.प.व पं.स. निवडणुकीसाठी आतापासूनच कामाला लागून आपला उमेदवार निवडून आला पाहिजे, अशी कार्यकर्त्यांनी जिद्द ठेवून काम करावे, असे प्रतिपादन माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी केले.
तालुक्यातील पांढरी जि.प.सर्कलच्या जिल्हा परिषद व पंचायत समिती क्षेत्रनिहाय मेळाव्याचे आयोजन शुक्रवारी कोसमतोंडी येथे करण्यात आले होते, यावेळी ते बोलत होते. मंचावर माजी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा पालकमंत्री राजकुमार बडोले, लक्ष्मीकांत धनगाये, शेषराव गिऱ्हेपुंजे, जे.डी. जगणीत अध्यक्ष अनुसूचित जाती, देवराम राहांगडाले, डॉ. बबन कांबळे, गिरिधारी हत्तीमारे, विश्वनाथ राहांगडाले, मनोहर काशीवार, चेतन वडगाये, भाजयुमो तालुकाध्यक्ष विलास बागडकर, शिशिर येळे, पांढरी जि.प. प्रमुख जगदीश काशीवार, महेंद्र टेंभरे, विजय बावनकर, किशोर मळकाम, प्रकाश काशीवार,अनिल गजभिये, माणिक चौधरी, प्रमोद खोब्रागडे, किशोर खोब्रागडे, मनोहर बावने, रामचंद्र काशीवार,भाजप तालुकाध्यक्ष अशोक लंजे आणि पांढरी जि.प.चे प्रभारी लक्ष्मीकांत धनगाये व पांढरी जि.प.क्षेत्रातील बूथप्रमुख व शक्तिकेंद्र प्रमुख उपस्थित होते. मेळाव्याप्रसंगी पक्षाच्या ज्येष्ठ सदस्यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. काही कार्यकर्त्यांनी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांचासुद्धा पक्षाचा दुपट्टा देऊन सत्कार करण्यात आला.
बडोले म्हणाले, राज्यातील महाविकास आघाडीचे शासन शेतकरी हिताचे नसून दलालांचे शासन आहे. या शासनाने कोविड-१९ कोरोना संक्रमण काळात शेतकऱ्यांचे व सर्वसामान्य नागरिकांनी वीजबिल भरू नये, कोरोना संक्रमण काळातील वीजबिल माफ करण्यात येईल असा डिंडोरा पिटला; पण वीजबिल माफी तर सोडा, आता शासन वीज कनेक्शन तोडण्याच्या तयारीत आहे. फडणवीस सरकारमध्ये शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांचे एका एकरावर १६ क्विंटल धान्य खरेदी केले जात होते. ते या आघाडी शासनाने एकरी १३ क्विंटलवर आणले. आघाडी शासन शेतकरी, सर्वसामान्य नागरिकांचे हिताचे नसून त्यांना लुबाडणारे शासन असल्याचा आरोप त्यांनी केला.