शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

वनरक्षकांना मिळणार सरकारी बाईक

By admin | Updated: August 11, 2016 00:02 IST

वनांचे संरक्षण करणाऱ्या वनरक्षकांना आता वनविभागाकडून दुचाकी वाहने दिली जाणार आहेत.

६०० वाहनांची होणार खरेदी : वनसंरक्षणासाठी वनविभागाचे प्रयत्न गोंदिया : वनांचे संरक्षण करणाऱ्या वनरक्षकांना आता वनविभागाकडून दुचाकी वाहने दिली जाणार आहेत. त्यामुळे वृक्षांची अवैध कटाई, वन्यप्राण्यांची हिंसा आदी अवैध बाबींवर आळा घालण्यासाठी वनविभागाचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी वनरक्षकांना ६०० शासकीय दुचाकी मिळणार असल्याचे सांगण्यात आले. वनांचे संरक्षण करण्यासोबतच वृक्षांची अवैध कत्तल, वन्यप्राणी व पक्ष्यांच्या शिकारीवर प्रतिबंध लावण्याच्या उद्देशाने आता वनरक्षकांना पोलिसांप्रमाणेच पहारा देण्यासाठी दुचाकी वाहन मिळणार आहेत. त्यासाठी वन विभागाद्वारे ६०० दुचाकींची खरेदी केली जाणार आहे. वनरक्षक, वनपाल यांच्या पदनावातही परिवर्तन करण्याचा निर्णय वन विभागाने घेतला आहे. वन विभागाचे मोठे कार्यक्षेत्र व व्यवसाय असल्यावरही इतर विभागांच्या तुलनेत वन विभागाला अधिक महत्त्व दिले जात नव्हते. सुधीर मुनगंटीवार हे वनमंत्री बनल्यानंतर या विभागात आमूलचूल परिवर्तनाचा शुभारंभ झालेला आहे. एवढेच नव्हे तर मुनगंटीवार यांनी वन विभागात उपक्रम क्रियान्वित करण्यासाठी निधीची तरतूदसुद्धा केली आहे. वनरक्षकांसाठी दुचाकी वाहन देण्याचा निर्णय मुनगंटीवार यांनी घेतला व त्यासाठी निधीची व्यवस्थासुद्धा करण्यात आल्याचे वनविभागाकडून सांगण्यात आले आहे. या निर्णयानुसार वनरक्षकांसाठी शासनाने आता ब्राँडेड कंपनीच्या ६०० बाईक्सची बुकिंग केलेली आहे. यापूर्वी वन विभागाने १८० चारचाकी वाहनांची खरेदी केली होती. त्यामुळे वन विभागात अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी वाहनांची कमतरता दूर झाली. आता वनरक्षकांना पहारा देण्यासाठी शासकीय दुचाकी वाहन मिळाल्यानंतर वनक्षेत्रात होणाऱ्या शिकारी व इतर अवैध कार्यांवर प्रतिबंध लावण्यात मदत मिळेल. खरेदी करण्यात आलेले दुचाकी वाहन राज्याच्या ११ वनक्षेत्रात व १६ व्याघ्र प्रकल्पात वनरक्षकांना दिल्या जातील.(प्रतिनिधी) पदनावातही होणार बदल वन विभागात नवनवीन बदल घडून येत आहेत. अनेक पदनावांतही परिवर्तन केले जात आहेत. वनपाल, वनरक्षक व वन मजूर यांच्या पदनावांत परिवर्तन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार आता वनपालास वन परिमंडळ अधिकारी, वनरक्षकांना नियत क्षेत्र अधिकारी व वनमजुरांना वनसेवक असे पदनाम देण्यात आले आहेत.