शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

वनक्षेत्रपाल रहांगडाले सुवर्णपदकाचे मानकरी

By admin | Updated: August 12, 2016 01:28 IST

अर्जुनी-मोरगाव वनपरिक्षेत्रातील वनक्षेत्रपाल सी.जी.रहांगडाले यांची वन व वन्यजीव व्यवस्थापनामध्ये भरीव कामगिरी केल्याबाबत सुवर्णपदकासाठी निवड करण्यात आली.

बोंडगावदेवी : अर्जुनी-मोरगाव वनपरिक्षेत्रातील वनक्षेत्रपाल सी.जी.रहांगडाले यांची वन व वन्यजीव व्यवस्थापनामध्ये भरीव कामगिरी केल्याबाबत सुवर्णपदकासाठी निवड करण्यात आली. राज्यभरातील वनकर्मचाऱ्यांमधून सुवर्णपदकासाठी निवड झालेले ते एकमेव आहेत. त्यांच्याशिवाय इतर २१ कर्मचाऱ्यांना रौप्य पदकांनी सन्मानित केले जाणार आहे. वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी वनसंरक्षणाचे काम प्रभावीपणे करीत असतात. त्यांचे मनोधैर्य वाढविण्याकरीता, तसेच त्यांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल प्रोत्साहित करण्याकरीता राज्यस्तरावरून पुरस्कार, बक्षीस देण्याची योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. वनरक्षक ते उपवनसंरक्षक या संवर्गातील कर्मचारी, अधिकारी यांना त्यांनी केलेले वनसंरक्षण, वन्यजीव संरक्षण, शोधकार्य, वनव्यवस्थापन, नाविण्यपूर्ण शोध याबद्दल सुवर्ण व रौप्य पदकं देऊन गौरविण्यात येते. यावर्षी वनक्षेत्रपाल संवर्गातून सी.जी.रहांगडाले यांची निवड सुवर्णपदकासाठी करण्यात आली. रहांगडाले यांनी आपल्या कार्यकाळात लाखांदूर वनक्षेत्रात इंदोरा येथे ३० हेक्टरमध्ये मिश्र रोपवन, मेळघाटमध्ये ३० हेक्टरात मिश्र रोपवन, कोच्छी येथे मिश्र रोपवन तसेच पंढरपूर वनक्षेत्रात लेंडवे चिचाळ, अर्जुनी -मोरगाव येथील तिडका, धाबेटेकडी येथे मिश्र रोपवनाची निर्मिती केली आहे. गावोगावी वनसमित्या स्थापन करून लोकांच्या मनामध्ये जंगलाविषयी आवड निर्माण करण्याची त्यांची विलक्षण हातोटी आहे. त्यामुळे अवैध वृक्षतोडीवर आळा बसलेला आहे. (वार्ताहर)