शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

वृक्षतोडीकडे वनविभागाचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:28 IST

किसान सन्मान योजनेपासून वंचित नवेगाव बांध : सरकारने कोरोना संकटकाळात दिलासा मिळावा, यासाठी किसान सन्मान योजनेच्या माध्यमातून दोन हजार ...

किसान सन्मान योजनेपासून वंचित

नवेगाव बांध : सरकारने कोरोना संकटकाळात दिलासा मिळावा, यासाठी किसान सन्मान योजनेच्या माध्यमातून दोन हजार रुपयांचा हप्ता जमा केला. या योजनेतून अनेक लाभ मिळाला. मात्र, अद्यापही अनेक शेतकऱ्यांना वारंवार शासकीय कार्यालयाचे उंबरठे झिजवूनही योजनेचा लाभ मिळाला नाही.

तिरोडा उपजिल्हा रुग्णालयात असुविधा

तिरोडा : तिरोडा येथील उपजिल्हा रुग्णालयात सुविधांचा अभाव असल्याने रुग्णांचे हाल होत आहेत. याकडे स्थानिक प्रशासन डोळेझाक करीत आहे. प्रशासनाने त्वरित लक्ष द्यावे, अशी मागणी केली जात आहे.

रेल्वे चौकीला उड्डाणपुलाची प्रतीक्षा

आमगाव : गोंदिया-आमगाव राज्य मार्गावर किडंगीपार येथील मुंबई-हावडा मार्गावर असलेली रेल्वे चौकी मालवाहतूक व प्रवासी वाहनांसाठी फार मोठी डोकेदुखी ठरत आहे. या मार्गावरील रेल्वे चौकीवर उड्डाणपुलाची मागणी प्रलंबित आहे. जनप्रतिनिधी नेहमी याकडे दुर्लक्ष करीत आहे.

रानडुकरांच्या हैदोसाने पिकाचे नुकसान

गोठणगाव : अर्जुनी-मोरगाव तालुक्यांंतर्गत साझा क्रमांक-२६ मध्ये रानडुकरांनी हैदोस मांडला असून, त्यामुळे धान पीक जमीनदोस्त झाले आहे. यासाठी शेतकऱ्यांना रानडुक्कर मारण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत. परिसरातील शेतकऱ्यांनी नैसर्गिक आपत्तीस समोर जाऊन ५० टक्के धान पीक वाचविले; परंतु रानडुकरांनी तेही पीक नासधूस करून जमीनदोस्त केले.

अनुदानाचे वाटप करण्याची मागणी

केशोरी : गेल्या सहा-सात महिन्यांपासून वयोवृद्ध निराधारांंना अद्यापही बँक खात्यात अनुदान जमा न झाल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. ज्येष्ठ वयोवृद्ध, दिव्यांग, निराधार असलेल्या लोकांना उपजीविका चालविण्यासाठी शासनाकडून संजय गांधी, श्रावण बाळ पेन्शन योजना कार्यान्वित करून दरमहा एक हजार रुपये अनुदान स्वरूपात दिले जाते; परंतु गेल्या सहा-सात महिन्यांपासून अनुदान जमा झाले नाही.

धान केंद्रावर सुविधांचा अभाव

गोंदिया : जिल्ह्यातील आधारभूत धान केंद्रावर शेतकऱ्यांना आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी संबंधित कृषी उत्पन्न बाजार समितीची असते. मात्र, येथे सुविधांना अभाव आहे.

भंगार बसेसमुळे प्रवासी त्रस्त

आमगाव : आगारातील भंगार बसेसमुळे प्रवासी चांगलेच त्रस्त झाले आहेत. अनेकदा बसमध्ये बिघाड किंवा टायर पंक्चर झाल्यास टुल्सकिट नसल्यामुळे प्रवाशांना तासन्‌तास ताटकळत बसावे लागते.

रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अपघातांची शक्यता

सालेकसा : शहरातील रस्त्यांवर अनेक खड्डे निर्माण झाले आहेत. या खड्ड्यांमुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. काही खड्ड्यांत भरण घातले तरीही ते धोकादायकच आहेत.

स्वच्छतेच्या अभावामुळे आजाराला आमंत्रण

गोंदिया : शहरातील विविध ठिकाणी विखुरलेला उघड्यावरील कचरा रोगराईला आमंत्रण देणारा ठरत आहे़ स्वच्छतेच्या अभावामुळे आजारांची शक्यता आणखी वाढत आहे. नगर परिषदेचे दुर्लक्ष आहे़.

उभ्या वाहनांमुळे अपघाताची शक्यता

देवरी : रस्त्याच्या कडेला वाहने उभी राहत असल्याने अपघाताची शक्यता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. उभ्या वाहनांमुळे वाहने बाहेर काढणे कठीण होत असून, याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

बदलत्या वातावरणाने आजार बळावले

बोंडगावदेवी : आठवडाभरापासून बदलत्या वातावरणामुळे आजाराने डोके वर काढले आहे. शहरी आणि ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात सर्दी व खोकल्याचे रुग्ण वाढत असल्याचे दिसून येत आहेत.

रुस्तमपूर-बुचाटोला-बोदलकसा रस्त्याचे खडीकरण करा

सुकडी-डाकराम : नक्षलग्रस्त व आदिवासीबहुल जंगलव्याप्त क्षेत्र म्हणून ओखळल्या जाणाऱ्या रुस्तमपूर-बुचाटोला-बोदलकसा रेस्ट हाउस (एमआयडीसी) रस्त्याचे खडीकरण करण्यात यावे, अशी मागणी तिरोडा तालुका काँग्रेस अनु.जाती विभागाचे अध्यक्ष एच. डी. जांभुळकर व पर्यटकांनी केली आहे.