शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

८९ लाखांची वनसंपदा राख

By admin | Updated: March 6, 2015 01:42 IST

मोठ्या प्रमाणात झालेल्या वृक्षतोडीमुळे ‘ग्लोबल वार्मिंग’चे संकट उभे आहे. या संकटावर मात करण्यासाठी शासनाने पर्यावरण ग्राम संतुलीत योजना आणली.

नरेश रहिले गोंदियामोठ्या प्रमाणात झालेल्या वृक्षतोडीमुळे ‘ग्लोबल वार्मिंग’चे संकट उभे आहे. या संकटावर मात करण्यासाठी शासनाने पर्यावरण ग्राम संतुलीत योजना आणली. या योजनेतून प्रत्येक गावाने रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे लावून १०० कोटी वृक्ष लागवडीचे उद्दीष्ट पूर्ण करायचे आहे, मात्र एकीकडे झाडे लावून ती जगविण्याचा खटाटोप सुरू असताना गुरुवारी सायंकाळी जिल्हाभरात २७२९ होळ्यांमधून १४ हजार ९५८ क्विंटल लाकडांची राखरांगोळी करण्यात आली. दुर्दैवाने या होळीत जाळण्यासाठी वापरलेली अर्ध्यापेक्षा जास्त लाकडे जीवंत झाडांवर कुऱ्हाड चालवून आणली होती.जिल्ह्याच्या १६ पोलीस ठाण्यांतर्गत १ हजार ७७३ सार्वजनिक तर ९५६ होळ्या खासगीरित्या पेटविण्यात आल्या. प्रत्येक होळीत किमान ५ क्विंटल लाकडे जळाल्याचे गृहित धरले तरी १५ हजार लाकडांची किंमत आजघडीला ८९ लाख १२ हजार ४०० रूपये होते. होळीतून होणारा पर्यावरणाचा ऱ्हास टाळण्यासाठी कितीही जनजागृती केली तरी प्रत्यक्षात परंपरा जपण्याकडेच नागरिकांचा कल असल्याचे यातून दिसून आले.गोंदिया शहर पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या परिसरात १२६ सार्वजनिक होळी तर खासगी ३००, रामनगर पोलीस ठाण्यांतर्गत सार्वजनिक ६५, खासगी २६, गोंदिया ग्रामीण पोलीस ठाण्यांतर्गत सार्वजनिक ४० तर खासगी ९१, रावणवाडी पोलीस ठाण्यांतर्गत सार्वजनिक १७१ खासगी ५०, गंगाझरी पोलीस ठाण्यांतर्गत सार्वजनिक ६०, खासगी २१, दवनीवाडा पोलीस ठाण्यांतर्गत सार्वजनिक ४० तर खासगी २६, तिरोडा पोलीस ठाण्यांतर्गत सार्वजनिक १६१ तर खासगी ७०, गोरेगाव पोलीस ठाण्यांतर्गत सार्वजनिक १५० तर खासगी ४३, आमगाव पोलीस ठाण्यांतर्गत सार्वजनिक ७६, खासगी १०, देवरी पोलीस ठाण्यांतर्गत सार्वजनिक २४२, खासगी ४६, चिचगड पोलीस ठाण्यांतर्गत सार्वजनिक ३५, खासगी ५१, नवेगावबांध पोलीस ठाण्यांतर्गत सार्वजनिक ५६ तर खासगी ११५, केशोरी पोलीस ठाण्यांतर्गत सार्वजनिक ४३ तर खासगी १०, अर्जुनी/मोरगाव पोलीस ठाण्यांतर्गत सार्वजनिक ९१ तर खासगी ६० होळ्या पेटविण्यात आल्या.एकीकडे पर्यावरण संतुलनासाठी वनविभागाबरोबर प्रत्येक ग्रामपंचायती सरसावल्या आहेत. मात्र त्याच गावातील नागरिकांनी जंगलातील, शेतातील झाडे तोडून कोट्यवधीची वनसंपदा होळीसाठी नष्ट केली जाते. आजघडीला एक क्विंटल लाकडाची किमत ६०० रुपये सांगितले जाते. या १४ हजार क्विंटल लाकडाची किंमत ८९ लाख १२ हजार ४०० रुपये होते. वनाधिकारी व वनकर्मचाऱ्यांच्या उदासीनतेमुळे नागरिक जंगलातील लाकडे कापून होळीत जाळून आनंदोत्सव साजरा करतात. पर्यावरणाची हाणी करणाऱ्या या प्रकाराला टाळण्यासाठी मात्र नागरिकांकडून फारसा प्रतिसाद दिसत नाही.होळीचा सण आनंदात साजरा करण्यासाठी ‘इको फ्रेन्डली होळी’ सारखे उपक्रम प्रत्येक गावात राबविले जाणे पर्यावरण संतुलनाच्या दृष्टीने गरजेचे आहे. पण त्यासाठी शासनाकडून पुढाकार घेतला जात नाही.