शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

वन्यप्राण्यांसाठी बांधला वनराई बंधारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2018 00:49 IST

नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्रात वन्यप्राण्यांसाठी श्रमदानातून वनराई बंधारा बांधण्यात आला. वन परिक्षेत्र बोंडे अंतर्गत येणाºया सहवनक्षेत्र पिंडकेपार मधील ग्राम परिस्थिती विकास समिती कोटजांभोराच्यावतीने वन्यजीव सप्ताहाचे औचित्य साधून वन्यप्राण्यांना पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे यासाठी......

ठळक मुद्देगावकऱ्यांचे श्रमदान : चिकणझरी नाल्यावर बांधकाम

लोकमत न्यूज नेटवर्कसडक अर्जुनी : नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्रात वन्यप्राण्यांसाठी श्रमदानातून वनराई बंधारा बांधण्यात आला. वन परिक्षेत्र बोंडे अंतर्गत येणाºया सहवनक्षेत्र पिंडकेपार मधील ग्राम परिस्थिती विकास समिती कोटजांभोराच्यावतीने वन्यजीव सप्ताहाचे औचित्य साधून वन्यप्राण्यांना पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे यासाठी पिंडकेपार भाग-१ कक्ष क्रमांक ६६६ मधील चिकणझरी नाल्यावर ११० सिमेंट बॅगचे वनराई बंधारा श्रमदानातून बांधण्यात आला.गावातील लोकांना वनांविषयी आपुलकी निर्माण व्हावी, वन व वन्यजीवांचे महत्व कळावे या उद्देशाने ग्रामस्थांची वनभ्रमंती करण्यात आली. नवेगावबांधचे सहायक वनरक्षक प्रदीप पाटील, वन्यजीव व अभयारण्य बोंडेचे वनपरिक्षेत्राधिकारी महेश चोपडे यांच्या मार्गदर्शनात क्षेत्र सहायक प्यारेलाल उसेंडी यांनी ग्राम कोडजमूरा येथील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना वन्यजीव सप्ताहा निमित्त वन व वनजीवांची माहिती दिली. शाळेत चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. प्रश्नमंजुषा स्पर्धा आयोजित करुन मुलांना प्राण्यांविषयी अधिकाधिक माहिती देण्यात आली. विविध झाडे, औषधी वनस्पती तसेच प्राण्यांच्या आवाजाची माहिती देण्यात आली.वृक्ष तोड व प्राण्यांविषयी जिव्हाळाचे महत्व पटवून दिले. यावेळी ग्राम परिस्थितीकी विकास समितीचे अध्यक्ष लखनलाल दूधकवर, तेजराम मडावी, मन्साराम नेताम, रुपेश राऊत, गेंदलाल गायगवाल, मानिक तराम, धनराज हिडामी, सुमनर करसायल, अशोक राऊत, अनिल बागतलवार, वनिता मेश्राम, कौशल्या मडावी, हिमेश्वरी सोनार, जाना वालदे, फुल मुंदी, आश हिडामी आदी गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नागरिकांना माहिती देण्यासाठी वनरक्षक शिला दालपिठे, ममता राऊत यांनी सहकार्य केले. संचालन करून आभार वनरक्षक अमित शहारे यांनी मानले.