शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यालयी राहण्याची सक्ती करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:31 IST

डिझेलच्या दरवाढीने शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ केशोरी : केंद्र सरकारने डिझेलचे भाव वाढविल्यामुळे सर्व क्षेत्रांसह शेतीवर मोठ्या प्रमाणात परिणाम होत ...

डिझेलच्या दरवाढीने शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ

केशोरी : केंद्र सरकारने डिझेलचे भाव वाढविल्यामुळे सर्व क्षेत्रांसह शेतीवर मोठ्या प्रमाणात परिणाम होत आहे. विदर्भातील गोंदिया, भंडारा या दोन जिल्ह्यांमध्ये धान पिकासह इतरही पिकांचे उत्पन्न घेण्यासाठी वर्षभर शेतकरी ट्रॅक्टरच्या साहाय्याने शेतीची मशागत करतात. शेतीच्या मशागतीसाठी वापरात येणारे महत्त्वाचे साधन म्हणजे ट्रॅक्टर होय. पण, आता महागाईमुळे ट्रॅक्टरद्वारे मशागत करणे कठीण झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

प्रवासी निवाऱ्यांची मागणी

मुंडीकोटा : तिरोडा तालुक्यातील नवेझरी या गावी प्रवासी निवारागृह होते. पण, जीर्ण होऊन जमीनदोस्त झाले आहे. या ठिकाणी प्रवासी निवारागृह असणे फार गरजेचे आहे. नवेझरी गावासाठी ही बाब फार खेदाची आहे. नवेझरी या गावी छोटीसी बाजारपेठ आहे. दर शुक्रवारी आठवडी बाजार भरत असतो. गांगला परिसरातील १० ते १५ खेडेगावांचा समावेश येत असतो. या गावी दिवसभर येणाऱ्या जाणाऱ्यांची वर्दळ असते.

बनगाव येथे घाणीचे साम्राज्य

आमगाव : बनगाव येथील वाॅर्डमधील नहर रोड, अनिहानगर व कामठा रोड परिसरात कचरापेटी नसल्याने घाण पसरली आहे. परिसरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग जमा झाले आहेत.

अनुदानाचे वाटप करण्याची मागणी

गोरेगाव : गेल्या ६ ते ७ महिन्यांपासून वयोवृद्ध निराधारांंना बँक खात्यात अनुदान जमा न झाल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. अनुदान जमा करण्याची मागणी होत आहे.

लाभापासून कर्मचारी वंचित

सडक-अर्जुनी : शासनाने राज्य कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करून वर्षभराचा कालावधी झाला; परंतु वनविकास महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना अद्याप लाभ देण्यात आला नाही.

हॉर्नमुळे शहरातील नागरिक त्रस्त

गोंदिया : शहराच्या आतील भागातून मोठ्या प्रमाणात जड वाहनांचे अवागमन होत असून, त्यांच्या कर्णकर्कश हॉर्नमुळे नागरिकांना त्रास होत आहे. अशांवर कारवाईची गरज आहे.

मोकाट जनावरांमुळे वाहतूक ठप्प

गोरेगाव : शहरातील रस्त्यांवर मोकाट जनावरांचा ठिय्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे वाहतूक ठप्प होत असून, नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.

आमगाव महामार्गाचे बांधकाम रखडले

आमगाव : राष्ट्रीय राज्य महामार्ग क्र. ५४३ व ३६३ वर सिमेंट रस्त्याचे बांधकाम सुरू आहे. मात्र, हे काम संथगतीने सुरू आहे. रस्त्यांलगत नाल्यांचे अपूर्ण बांधकाम पावसाळ्यात लोकवस्तीकरिता धोक्याची घंटा ठरत आहे. हे काम करणाऱ्या कंपनीने या बांधकामाचे बारा वाजवून ठेवले आहेत. संपूर्ण बांधकाम निकृष्ट दर्जाचे असून, लक्ष ठे‌वण्याची गरज आहे.

राष्ट्रीय महामार्गावर वाहनांची वर्दळ

आमगाव : चौपदरीकरण झालेला राष्ट्रीय महामार्ग शहरातून गेला आहे. जवळपास दोन कि.मी. पर्यंतच्या महामार्गावर उड्डाणपुलाचे बांधकाम सुरु आहे. दरम्यान या मार्गावरुन भरधाव वाहनांची वर्दळ सतत असते. रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहनांमुळे त्रास सहन करावा लागत आहे.