शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

‘सिंचन विहिरीं’च्या अनुदानासाठी पायपीट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2017 00:56 IST

शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जलसिंचनाची सोय करुन बळीराजा सुखी, संपन्न व्हावा यासाठी अर्जुनी मोरगाव तालुक्यात मागेल त्याला सिंचन विहिर हा धडक कार्यक्रम राबविण्यात येत आहे.

३०० विहिरी मंजूर : ७२ विहिरी प्रगतीपथावरअमरचंद ठवरे बोंडगावदेवीशेतकऱ्यांच्या शेतामध्ये जलसिंचनाची सोय करुन बळीराजा सुखी, संपन्न व्हावा यासाठी अर्जुनी मोरगाव तालुक्यात मागेल त्याला सिंचन विहिर हा धडक कार्यक्रम राबविण्यात येत आहे. तालुक्यात सध्या ३०० लाभार्थी शेतकऱ्यांना विहिरी मंजूर झाल्या असून ७२ विहिरींचे काम प्रगतीपथावर आहे. काही विहिरींचे बांधकाम पूर्णत्वास गेले असले तरी संबंधित लाभार्थ्यांना अनुदानाचा एकाही टप्प्याचा धनादेश मिळालेला नाही किंवा रक्कम त्यांच्या खात्यात जमा झालेली नाही. यामुळे शेवटच्या टप्यापर्यंत काम केलेले शेतकरी अनुदानासाठी पंचायत समिती कार्यालयाच्या चकरा मारत असल्याचे दिसून येतात. महाराष्ट्र शासनाच्या वतीने संपूर्ण राज्यात मागेल त्याला विहिर हा धडक कार्यक्रम युद्धस्तरावर राबविल्या जात आहे. त्याच अनुषंगाने अर्जुनी मोरगाव तालुक्यात सदर कार्यक्रमांतर्गत ३०० विहिर मंजूर झाल्या असून ९० लाभार्थी प्रतीक्षा यादीवर असल्याचे समजते. मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यात ७२ विहीरींचे काम प्रगतीपथावर आहे. काही विहिरी पूर्णत्वापर्यंत पोहोचल्या असल्याची माहिती आहे. सदर विहिरीच्या बांधकामासाठी २ लाख ५० हजार रुपयांचे अनुदान संबंधीत लाभार्थी शेतकऱ्यांना देण्यात येणार असल्याचे सांगितले जाते. सदर अनुदान कामाची प्रगती पाहून ५ टक्यामध्ये लाभार्थी शेतकऱ्यांना देण्यात यावे असा निकष असतानी, आजपर्यंत पंचायत समितीकडून लाभार्थी शेतकऱ्यांना अनुदानाचा एकही टप्पा वितरीत करण्यात आला नाही. संबंधीत लाभार्थ्यांना अनुदानाची राशी अजूनपावेतो मिळाली नसल्याने पंचायत समिती कार्यालयाची वारंवार पायपीट करावी लागते. अनुदानाची राशी मिळाल्यास कमालीचा विलंब होत अससल्याने आर्थिक समस्या निर्माण झाल्याचे लाभार्थी शेतकऱ्यांनी आपली व्यथा ‘लोकमत’ं जवळ बोलून दाखविली.प्राप्त माहितीनुसार, तालुक्यात मंजूर विहिरीपैकी ७२ विहिरींच्या कामाला सुरुवात झाली आहे. बांधकाम सुरू झालेल्या विहिरीचे मंजूर झालेले अनुदान १ कोटी ७ लाख रुपये पंचायत समितीच्या खात्यावर जमा झाल्याची माहिती आहे. अनुदानी रक्कम पंचायत समितीमध्ये जमा असली तरी संबंधीत लाभार्थी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचल्यास विलंब होण्याचे कारण मात्र कळू शकले नाही. लाभार्थ्यापर्यंत अनुदान पोहोचविण्यासाठी पंचायत समिती कार्यालयातील प्रशासकीय अधिकारी अडसर ठरत असल्याचे बोलल्या जाते. लघु पाटबंधारे जि.प. उपविभाग अर्जुनी मोरगाव कार्यालयाअंतर्गत ‘मागेल त्याला सिंचन विहिर’ हा धडक काार्यक्रम राबविला जात असून अनुदानाची राशी पंचायत समिती कार्यालयाकडून वितरीत केली जात असल्याचे सांगण्यात येते. तालुक्यातील लाभार्थी शेतकऱ्यांना विहिर मंजूर झाली. त्याची प्रशासकीय मंजुरी यादी संबंधित विभागाला कळविण्यात आली आहे. तरी सुद्धा संबंधीत विभागाच्या अधिकाऱ्यांच्या चुकांमुळे लाभार्थी शेतकऱ्यांंना कमालीचा मन:स्ताप सहन करावा लागत आहे.विहिरीच्या खोदकामाच्या कोणत्याही टप्याचे अनुदान शेतकऱ्यांच्या हातात न मिळाल्याने आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. पंचायत समितीमध्ये अनुदान येवून लाभार्थ्यांना वारंवार चकरा माराव्या लागत असताना सुद्धा पं.स.चे पदाधिकारी मात्र गप्प असल्याचे शेतकरी जाम निराश झाल्याचे दिसते. बांधकाम झालेल्याव विहिरीचे अनुदान देण्याची मागणी लाभार्थी शेतकरी करीत आहेत.