शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
3
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
4
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
5
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
6
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
7
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
8
आयोग नव्हे, मतदारच राजा !
9
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
10
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
11
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
12
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
13
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
14
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
15
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
16
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
17
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
18
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
19
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
20
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई

उघड्यावरील खाद्यपदार्थांनी आरोग्याची ‘ऐसीतैसी’

By admin | Updated: September 11, 2014 23:38 IST

गरमागरम भजी, पाणीपुरी, भेळ, नुडल्स, मंचुरीअन यांच्यावर घोंघावत असलेल्या माशा. त्यांच्यावर ताव मारणारे खव्वय्ये, हे दृश्य आजघडीला सर्वत्र दिसून येत आहे. तरीसुद्धा त्याची कोणतीही

गोंदिया : गरमागरम भजी, पाणीपुरी, भेळ, नुडल्स, मंचुरीअन यांच्यावर घोंघावत असलेल्या माशा. त्यांच्यावर ताव मारणारे खव्वय्ये, हे दृश्य आजघडीला सर्वत्र दिसून येत आहे. तरीसुद्धा त्याची कोणतीही पर्वा न करता पोटपुजा करताना दिसतात. पावसाळ्यात उघड्यावरील खाद्यपदार्थांमुळे नानाविध आजारांना आमंत्रण मिळत असते. असे असतानाही खाण्याचा मोह आवरता येत नाही. आजारांसाठी ही एक धोक्याची घंटा आहे.वैद्यकीय सुत्रानुसार ७० टक्के पोटाचे आजार हे उघड्यावरील अन्न खाल्लयाने हात असतात. यावर वेळीच आवर घालणे गरजेचे आहे. दुसरीकडे उघड्यावर खाद्यान्न विकणाऱ्यांवर अद्याप कोणतीही ठोस कारवाई करण्यात न आल्याने हा प्रकार सर्रास सुरू आहे. बदलत्या जिवनशैलीमुळे खाण्याच्या पद्धतीही बदलल्या. आज ठिकठिकाणी खानावळी, हॉटेल्स, रेस्टॉरेंट थाटण्यात आलेली आहेत. पाश्चात्य देशांमध्ये प्रसिद्ध असलेले विविध पदार्थही मेजवाणीसाठी तयार असतात. चिभेची चव बदलण्यासाठी प्रत्येक कुटूंब या पदार्थांचा आस्वाद घेत असतात. परंतु, आपण जे खात आहोत ते कितपत योग्य आहे, याची माहिती कुणालाही नसते. जिल्ह्यात खाद्यपदार्थ तयार करण्यासाठी अन्न सुरक्षा मानक कायद्यातील निकषांचा विचार करावयास पाहिजे. परंतु, जिल्ह्यात या कायद्याचा कुणीही विचार करीत नाही. हे सर्व नियम धाब्यावर बसवून नागरिकांच्या आरोग्याशी खेळण्याचा प्रकार सुरू आहे. मागीलवर्षी अन्न व औषधी विभागाच्या नागपूर येथील चमूने जिल्ह्याचा दौरा करुन हॉटेल्स, खानावळी, रेस्टॉरेंटमधील पाहणी केली होती. त्यातील अनेक जणांकडे व्यवसाय करण्याचा परवाना नव्हता. तेव्हा त्यांच्याकडून परवाना तसेच दंड आकारण्यात आला होता. त्यानंतर ही मोहिम राबविण्यात आली नाही. जिल्ह्यात मुख्य रस्त्यावर तसेच गर्दीच्या ठिकाणी खाद्यांनांचे दुकाने थाटण्यात आली आहेत. त्या दुकानांना परवाने आहेत किंवा नाही याची तसदी अन्न व औषधी विभागाने कधी घेतली नाही. शिवाय या दुकानांमध्ये वापरण्यात येणारे अन्न पदार्थ, पाणी यांची गुणवत्ता काय, याचाही विचार करण्यात आलेला नाही. या व्यापाऱ्यांवर कारवाई करण्याऐवजी नोंदणी व परवाने तयार करण्यावरच अधिक भर देत आहे. नियमाप्रमाणे अन्न पदार्थ व विक्र ीचा परिसर स्वच्छ ठेवणे गरजेचे आहे. त्याठिकाणी वापरण्यात येणारे पिण्याचे पाण्याचे नमुने अधिकृत प्रयोगशाळेतून तपासून घेण्यात यावे, ज्याठिकाणी खाद्यपदार्थांची विक्र ी असते त्या ठिकाणी पिण्याचे शुद्ध पाणी ठेवावे आदी निकष आहेत. परंतु, यापैकी एकाही निकषांची पुर्तता केली जात नाही. परिणामी, नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत असते. गोंदियात दरवर्षी पावसाळ्यात चिखलमय वातावरण असते. परंतू एफडीएकडून कधीही तपासणी होत नाही. (प्रतिनिधी)