शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

अन्न पदार्थांची तपासणी व्हावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2019 20:39 IST

उघड्यावरील खाद्य पदार्थ खाल्ल्याने पोटात आजार होण्याचा धोका असल्याने तपासणीचे कडक नियम तयार करण्यात आले. परंतु गोंदिया शहर व जिल्ह्यातील तालुक्याच्या ठिकाणी अशी तपासणी केली जात नाही. परिणामी संबंधित विभागाच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे.

ठळक मुद्देनागरिकांची मागणी : उघड्यावरील पदार्थांमुळे आरोग्य धोक्यात

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : उघड्यावरील खाद्य पदार्थ खाल्ल्याने पोटात आजार होण्याचा धोका असल्याने तपासणीचे कडक नियम तयार करण्यात आले. परंतु गोंदिया शहर व जिल्ह्यातील तालुक्याच्या ठिकाणी अशी तपासणी केली जात नाही. परिणामी संबंधित विभागाच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे.उघड्यावरील विविध खाद्यपदार्थांचे आपण सेवन करतो. पण यातील अन्नघटक आरोग्यासाठी कितपत हितकारक व घातक आहे याची कल्पना नसते. त्यामुळेच अन्न पदार्थाची विविध निकषावर तपासणी करण्यासाठी शासनाने अन्न व औषध प्रशासन विभागाची यंत्रणा तयार केली आहे. गोंदिया शहरातील बाजारपेठ दिवसेंदिवस वाढत आहे. विविध हॉटेल्स व रस्त्यावर अन्न पदार्थ विक्री केले जाते. पण नागरिकांचे आरोग्य सुदृढ राहावे, अन्न पदार्थापासून त्यांना कोणताही अपाय होऊ नये, याकरिता कठोर तपासणी करणे गरजेचे आहे. नागरिकांच्या आरोग्याशी निगडीत असणाऱ्या या यंत्रणेची जवाबदारी महत्वपूर्ण ठरते.मात्र, जिल्ह्यात विभागाच्या कारवाया थंडावल्या आहेत. याचा गैरफायदा अन्न पदार्थ विकणारे विक्रेते घेत आहेत. असा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. याशिवाय खाद्य पदार्थांमध्ये भेसळ करुन ग्राहकांच्या माथी मारण्याच्या घटना शहरात वाढीस लागल्या आहेत. यातून आर्थिक व आरोग्याचे नुकसान होत आहे. खाद्य पदार्थांमध्ये भेसळ करणाऱ्यांना प्रतिबंध करण्यासाठी संबंधित विभागाने कठोर अंमलबजावणी करण्याची मागणी नागरिक करीत आहेत.खाद्य तेलात भेसळीचे प्रमाण वाढलेदुग्धजन्य पदार्थासोबत खाद्यतेलात भेसळ करण्याच्या घटना उजेडात येत आहेत. खाद्य पदार्थात भेसळीचे प्रमाण वाढले. शासनाने तंबाखूजन्य पदार्थांची बंदी केली आहे. खर्रा विक्री करणाऱ्या पानठेला चालकांवर कारवाईचा बडगा उगारणे गरजेचे आहे. पण, पानठेल्यांवर कारवाई करण्याची मोहिम थंडावली. नागरिकांचे आरोग्य लक्षात घेऊन संबंधित दोषी दुकानदारांवर प्रशासनाने कारवाई करण्याची मागणी ग्राहक करीत आहेत.अपायकारक औषधींचा शोध घ्यावाखाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या छोट्या-मोठ्या हॉटेलांपासून तर पानठेला चालकांची नियमित तपासणी करावी लागते. खाद्य पदार्थ उघड्यावर बनविण्यास नियमानुसार सक्त मनाई आहे. आरोग्याच्या दृष्टीने स्वच्छता आहे किंवा नाही यासंदर्भात अनेक बाबींची तपासणी केली जाते. दोष सिद्ध झाल्यास कारवाई होते. औषध विक्रेत्यांकडेही अपयकारक औषधी असण्याची शक्यता असल्याने कठोर तपासणीची गरज आहे.कॉर्बाईडचा सर्रास वापरसध्या बाजारात अपरिपक्क टरबूज, केळी, परराज्यातील आंबे मोठ्या प्रमाणात येत आहेत. ते सर्रासपणे कार्बाईडने पिकविले जातात. अन्न प्रशासनाच्या नियमानुसार ही कार्बाईडने पिकविलेली फळे आरोग्यास घातक असल्यामुळे ती विकताना आढळल्यास संबंधित विक्रेत्यावर गुन्हा दाखल होऊन त्याला गजाआड केले जाते. परंतु शहरात ना कोणत्या फळविक्रेत्याची तपासणी होते, ना कुणावर कारवाई केली जाते.

टॅग्स :foodअन्न