शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

आधार क्रमांकानुसार धान्य वाटप १ जुलैपासून

By admin | Updated: June 21, 2017 01:08 IST

सार्वजनिक वितरण व्यवस्थेचे संगणकीकरणाचे काम सुरु आहे. १ जुलैपासून आधार क्र मांकानुसार धान्य वाटप होणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : सार्वजनिक वितरण व्यवस्थेचे संगणकीकरणाचे काम सुरु आहे. १ जुलैपासून आधार क्र मांकानुसार धान्य वाटप होणार आहे. केंद्र शासनाच्या अन्न मंत्रालयाच्या अधिसूचनेनुसार सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत लाभ मिळण्यासाठी पात्र लाभार्थ्यांना आधार क्र मांक संबंधित तहसील कार्यालयास ३० जून पर्यंत सादर करणे अनिवार्य आहे. त्यामुळे ज्या शिधा पत्रिकाधारकांनी अद्याप आधार क्र मांक दिले नसतील त्यांनी तहसील कार्यालय पुरवठा विभाग अथवा आपल्या स्वस्त धान्य दुकानदारांकडे जमा करावे. जे पात्र लाभार्थी विहीत मुदतीत आधार क्र मांक जमा करणार नाही त्यांना लाभ अनुज्ञेय होणार नाही. अशा पात्र शिधा पत्रिकाधारकांना पुढील प्रमाणे कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतरच लाभ अनुज्ञेय होईल. शिधा पत्रिका, आधार नोंदणी केल्याची स्लीप किंवा आधार नोंदणी करण्यासाठी केलेल्या विहीत नमून्यातील विनंतीची प्रत व मतदान ओळखपत्र, पॅन कार्ड, पासपोर्ट, प्राधिकृत अधिकाऱ्याने दिलेला वाहन चालक परवाना, राजपत्रीत अधिकारी किंवा तहसीलदार यांच्या पत्रावर निर्गमित फोटो ओळखपत्र/फोटोयुक्त बँक पासबुक, पोस्ट विभागाकडून देण्यात आलेले निवास पत्ता असणारे कार्ड, किसान फोटो पासबुक,अन्य राज्य शासन/केंद्रशासीत प्रदेश प्रशासनाकडून विनिर्दिष्ट अन्य दस्तऐवज यापैकी कोणतेही एक कागदपत्र, असे जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी कळविले आहे.