गोंदिया : गोंदिया रेस्टॉरंट असोसिएशनने अन्न व सुरक्षा विभागासोबत शहराच्या एका हॉटेलात कार्यशाळा घेतली. अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त ए. पी. देशपांडे यांनी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांची माहिती दिली. अन्न सुरक्षा अधिकारी एस. एस. देशपांडे यांनी प्रोजेक्टरच्या माध्यमातून रेस्टॉरंट व हॉटेलमध्ये काय आवश्यक आहे. कोणती सावधगिरी बाळगावी यावर माहिती दिली.
कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी गोंदिया रेस्टॉरंट असोसिएशनचे अध्यक्ष अखिलेश सेठ, अन्न सुरक्षा अधिकारी बी. जी. नंदनवार, पीयूष मानवटकर उपस्थित होते. यावेळी हॉटेल चालक राजेश चावडा, गिरीश शिवहरे, राजन शिवहरे, सिमरन होरा, मनीष अग्रवाल, बंटी चौधरी, राहुल वंजारी, अमृत चौरसिया, के. चतवानी, जगजितसिंग भाटिया, अंकित पटेल, गुलशन यादव, विकास बिसेन, फारुख सोलंकी, रवींद्र जैन, तुषार चौरसिया, नीरज अग्रवाल, मनीष अग्रवाल, घनश्याम जाडेजा, नीरज रंगलानी, नाशिर सोलंकी, संजय लारोकर, संजय शर्मा, ललित शर्मा उपस्थित होते.