शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
2
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
3
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
4
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
5
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
6
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
7
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
8
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
9
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
10
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
11
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
12
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
13
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
14
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
15
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
16
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
17
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
18
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
19
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक
20
एकनाथ शिंदेंच्या त्रासाला कंटाळून नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये जाणार होते!; ठाकरे गटाचा दावा

परदेशातून जिल्ह्यात येणाऱ्या प्रवाशांवर लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2020 06:00 IST

पत्रकार परिषदेला जि.प.मुख्यकार्यकारी अधिकारी राजा दयानिधी, निवासी उपजिल्हाधिकारी स्मिता बेलपत्रे,प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन कापसे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संगिता पाटील उपस्थित होते. जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांनी चीन, कोरिया, मलेशिया,सिंगापूर, इटली, इराण या देशातून जिल्ह्यात येणाऱ्या नागरिकांवर विशेष लक्ष ठेवले जात आहे.

ठळक मुद्देकादंबरी बलकवडे : अफवांवर विश्वास ठेऊ नका, कोरोना जनजागृती,वैद्यकीय महाविद्यालयात कक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात अद्याप एकही कोरोनाचा संशयीत रुग्ण आढळलेला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांनी घाबरण्याची गरज नसून आपल्या आरोग्याविषयी सजग असणे आवश्यक आहे.कोरोनाची लागण ही प्रामुख्याने बाहेर देशातून येणाºया नागरिकांपासून होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे परदेशातून जिल्ह्यात येणाऱ्या नागरिकांवर लक्ष ठेवण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज आहे.तसेच यासाठी विशेष पथक तयार करण्यात आले असल्याचे जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे यांनी गुरूवारी (दि.१२) जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले.पत्रकार परिषदेला जि.प.मुख्यकार्यकारी अधिकारी राजा दयानिधी, निवासी उपजिल्हाधिकारी स्मिता बेलपत्रे,प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन कापसे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संगिता पाटील उपस्थित होते. जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांनी चीन, कोरिया, मलेशिया,सिंगापूर, इटली, इराण या देशातून जिल्ह्यात येणाऱ्या नागरिकांवर विशेष लक्ष ठेवले जात आहे. तसेच परदेशातून आलेल्या रुग्णांनी याची माहिती जिल्हा प्रशासनाला द्यावी. त्यांनी आरोग्य विषयक तपासणी करुन खबरदारीचा उपाय म्हणून पंधरा दिवस घराबाहेर पडू नये, अशा सूचना सुध्दा त्यांना देण्यात येणार असल्याचे सांगितले. याची माहिती प्रशासनाला मिळावी यासाठी एक पथक सुध्दा तयार करण्यात आले आहे. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संगिता पाटील आणि जिल्हा साथरोग अधिकारी निरंजन अग्रवाल यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. कोरोना संदर्भात मोठ्या प्रमाणात अफवा पसरविल्या जात आहे. मात्र नागरिकांनी अशा अफवांवर विश्वास ठेऊ नये, कुणाला शंका आल्यास त्यांनी टोल फ्री क्रमांकावर कॉल करुन याची खात्री करुन घ्यावी. कोरोनाचे संशयीत रुग्ण आढळल्यास त्यांना दाखल करण्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात १० खाटांचे विशेष विलगीकरण कक्ष स्थापन करण्यात आले आहे. तसेच तालुका स्तरावर सुध्दा अशा कक्षांची व्यवस्था करण्यात आली आहे. याशिवाय गरज पडल्यास गोंदिया नगर परिषदेच्या दोन शाळांमध्ये कक्ष सुरू करण्याची तयारी प्रशासनाने केली असल्याचे सांगितले.पोस्टर बॅनर व जिंगलमधून जनजागृतीकोरोना संदर्भात नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी पोस्टर, बॅनर तसेच नगर परिषदेच्या कचरा संकलन करणाºया वाहनांवरील लाऊड स्पिकरवर जिंगलच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी बलकवडे यांनी सांगितले.गर्दी होणारे कार्यक्रम घेणे टाळाजिल्ह्यात मेळावे, सामुहिक विवाह सोहळे, यात्रा तसेच गर्दी होणारे कार्यक्रम १५ एप्रिलपर्यंत घेण्यात येऊ नये, अशा सूचना सर्व शासकीय विभागाना करण्यात आल्या आहे. तसेच नागरिकांनी सुध्दा असे कार्यक्रम घेऊन नये अथवा काही दिवस अशा कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्याचे टाळावे. जिल्हा प्रशासनाने सुध्दा असे कार्यक्रम काही दिवस पुढे ढकलले असल्याचे जिल्हाधिकारी बलकवडे यांनी सांगितले.शाळांमध्ये हॅन्डवॉश डेकोरोना व्हायरसचा संर्सग होऊ नये यासाठी आवश्यक ती खबरदारी आणि उपाय योजना केल्या जात आहे. शाळांमध्ये यासंदर्भात जनजागृती केली जात असून शाळांमध्ये नियमित हॅन्डवॉश डे घेण्याच्या सूचना शाळा व्यवस्थापणाला करण्यात आल्या आहे.

टॅग्स :corona virusकोरोनाcollectorजिल्हाधिकारी