शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

उड्डाणपुलाच्या फाईलचा आॅफिस टू आॅफिस प्रवास सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2019 20:53 IST

शहरातील गोंदिया-बालाघाट मार्गावरील जुना उड्डाणपूल जीर्ण झाला असून तो पाडण्याचे निर्देश रेल्वे विभागाने सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले. याला आठ महिन्यांचा कालावधी लोटला असून अद्यापही कुठलीच कारवाही करण्यात आली नाही.

ठळक मुद्देप्रस्ताव पाठवून प्रशासन मोकळे : शहरवासीयांवरील धोका कायम

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शहरातील गोंदिया-बालाघाट मार्गावरील जुना उड्डाणपूल जीर्ण झाला असून तो पाडण्याचे निर्देश रेल्वे विभागाने सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले. याला आठ महिन्यांचा कालावधी लोटला असून अद्यापही कुठलीच कारवाही करण्यात आली नाही. त्यामुळे उड्डाणपुलाच्या फाईलचा प्रवास मागील आठ महिन्यापासून केवळ आॅफिस टू आॅफिस असाच सुरू आहे.गोंदिया-बालाघाट मार्गावरील जुना उड्डाणपूल जीर्ण झाला असून तो वाहतुकीसाठी धोकादायक असल्याचे पत्र रेल्वे विभागाने जिल्हा प्रशासन आणि सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले होते. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने उड्डाणपुलावरुन जड वाहतूक बंद केली. सध्या केवळ टू व्हिलर आणि थ्री व्हिलर वाहनांना प्रवेश दिला जात आहे. मात्र रेल्वे ट्रॅकच्या परिसरातील उड्डाणपुलाचा भाग पूर्णपणे जीर्ण झाला असून तेव्हाही कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे रेल्वे विभागाने जिल्हाधिकारी कार्यालय व सार्वजनिक बांधकाम विभागाला तीनदा पत्र देऊन जुना उड्डाणपूल वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करुन तो पाडण्याची सूचना केली होती. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाने या पुलाचे स्ट्रक्चरल आॅडिट करुन पुलाची थोडी डागडूजी केली.जुना जीर्ण उड्डाणपूल पाडूृन त्या ठिकाणी नवीन उड्डाणपूल तयार करण्यासाठी ८४ कोटी रुपयांचा प्रस्ताव शासनाकडे मंजुरीसाठी पाठविला. मात्र या प्रस्ताव अद्यापही कुठलाच विचार झाला नसून ही फाईल सुध्दा उघडून पाहण्यात आली नसल्याची माहिती आहे. मात्र यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने सुध्दा या फाईलचे नेमके काय झाले याचा पाठपुरावा केला नसल्याची माहिती आहे.केवळ शासनाकडे प्रस्ताव पाठवून मोकळे होण्यातच धन्यता मानली.त्यामुळे शहरवासीयांवरील धोका कायम आहे. एखाद्या वेळेस हा पूल कोसळून एखादी घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण राहणार असा प्रश्न सुध्दा उपस्थित केला जात आहे.रेल्वे प्रशासन हतबलजुना जीर्ण झालेला उड्डाणपूल पाडण्यासंदर्भात रेल्वे विभागाने आत्तापर्यंत जिल्हाधिकारी कार्यालय आणि सार्वजनिक बांधकाम विभागाकडे अनेकदा पत्र व्यवहार केला. तसेच या विषयावर चार ते पाच बैठका घेतल्या. मात्र यानंतरही जिल्हा प्रशासनातर्फे जुना जीर्ण उड्डाणपूल पाडण्यासाठी कुठलेच पाऊल उचलण्यात आले नसल्याने रेल्वे विभाग सुध्दा हतबल झाला आहे.चारचाकी वाहनांची वाहतूक सुरूचजुन्या उड्डाणपुलावर चारचाकी वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला असला तरी या पुलावरुन चारचाकी वाहने सर्रासपणे धावत आहे.विशेष म्हणजे या ठिकाणी वाहतूक पोलीस शिपाय देखील कर्तव्यावर राहत असून त्यांच्याच डोळ्यादेखत नियमाचे उल्लघंन करुन सर्रासपणे चारचाकी वाहने धावत आहे.पाठपुराव्यासाठी कुणी पुढे येईनाशहरातील जुना जीर्ण उड्डाणपूल पाडून त्या ठिकाणी नवीन उड्डाणपूल तयार करण्यासाठी राजकीय वजनाची गरज आहे. मात्र मागील आठ महिन्यांपासून ८४ कोटी रुपयांचा उड्डाणपूल बांधण्याचा प्रस्ताव मंत्रालयात धूळखात पडला आहे. मात्र यासाठी पाठपुरावा करण्यासाठी कुणीच पुढे येत नसल्याचे चित्र आहे.आचारसंहितेने काम लांबणीवरसध्या लोकसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू असल्याने याचा उड्डाणपुलाच्या प्रस्तावाला सुध्दा फटका बसल्याची माहिती आहे.पुन्हा दोन महिने पुलाच्या प्रस्तावावर विचार होण्याची शक्यता कमी असून तोपर्यंत शहरवासीयांना धोका पत्थकारावा लागणार आहे.