शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

युवा पुरस्काराने उडान संस्था सन्मानित ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:34 IST

गोंदिया : महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा धोरणानुसार जिल्ह्यातील युवक-युवती व संस्थांनी केलेल्या समाज हिताच्या कार्याचा गौरव करण्यासाठी व त्यांना प्रोत्साहन ...

गोंदिया : महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा धोरणानुसार जिल्ह्यातील युवक-युवती व संस्थांनी केलेल्या समाज हिताच्या कार्याचा गौरव करण्यासाठी व त्यांना प्रोत्साहन मिळावे, यासाठी जिल्हा युवा पुरस्कार देण्यात येतो. सन २०१९-२० या वर्षाचा युवा पुरस्कार आमगाव तालुक्यातील ग्राम पदमपूर येथील उडान बहूद्देशीय विकास संस्थेला पालकमंत्री नवाब मलीक यांच्या हस्ते स्वातंत्र्यदिनी पोलीस मुख्यालयातील शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमात प्रदान करण्यात आला.

यावेळी जिल्हाधिकारी नयना गुंडे, पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, जिल्हा क्रीडा अधिकारी घनश्याम राठोड, क्रीडा अधिकारी ए.डी.मरस्कोल्हे, राज्य क्रीडा मार्गदर्शक एन.एस.उईके, धनंजय बारसागडे, तालुका क्रीडा अधिकारी राजेंद्र शिंदे उपस्थित होते. उडान बहूद्देशीय विकास संस्थेला समाजसेवेत केलेल्या उल्लेखनीय कार्यामुळे शासनाचा युवा पुरस्कार म्हणून गौरवपत्र, सन्मानचिन्ह व ५० हजार रुपये रोख प्रदान करण्यात आले. संस्थेने रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर, पूरपीडितांना मदत, वृक्षारोपण, कोविड संकटात गरजूंना मदत, स्वच्छता मोहीम, प्लास्टिकमुक्ती संकल्पना, पाणी बचत, पक्षी बचाओ, चिनी वस्तूंचा बहिष्कार, एड्‌स जनजागृती, सिकलसेल जनजागृती, साक्षरता, ज्येष्ठांचा सन्मान, बालकांना त्यांचा हक्क, शाळाबाह्य मुलांचा शोध घेणे, व्यसनमुक्त समाज, क्षयरोग जनजागृती, प्राण्यांना जीवनदान, वनराई बंधारा निर्मिती, निराधार, विधवा, परित्यक्ता यांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी मदत करण्यासारखे कार्य केले.

हा पुरस्कार संस्थेचे कोषाध्यक्ष रविकांत पाऊलझगडे, अध्यक्ष आशिष तलमले, नरेश येटरे, प्रेमानंद पाथोडे, अतुल फुंडे, सचिन तलमले, दिनेश गिऱ्हेपुंजे, प्रिनल वंजारी, दीपक भांडारकर, नरेश बोहरे, रामभरोस चक्रवर्ती, मोहन ब्राम्हणकर, विजय कोरे, हिमालय राऊत, ज्ञानेश्वर खोटेले, प्रणय फुंडे, प्रवीण कोहळे, हरिश भुते, अरुण भुते, हार्दिक भुते, जीवन फुंडे, नरेश रहिले व इतरांनी स्वीकारला.