शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

मुंंबईमध्ये फडकला गोंदियाचा झेंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2019 22:17 IST

मुंबई येथे रविवारी (दि.२०) पार पडलेल्या राष्ट्रीय मॅराथॉनमध्ये जिल्ह्यातील १३२ मुलांमुलींनी भाग घेत मुंबईतही गोंदियाचा झेंडा फडकविला. मॅराथॉनमध्ये विविध गटांत उत्कृष्ट कामगिरी करून परत आलेल्या या खेळाडूंचे मंगळवारी (दि.२२) रेल्वे स्थानकावर पोलीस विभागाकडून जंगी स्वागत करण्यात आले.

ठळक मुद्देजिल्ह्यातील १३२ मुलामुलींचा सहभाग : गोंदिया रेल्वेस्थानकावर झाले जंगी स्वागत

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : मुंबई येथे रविवारी (दि.२०) पार पडलेल्या राष्ट्रीय मॅराथॉनमध्ये जिल्ह्यातील १३२ मुलांमुलींनी भाग घेत मुंबईतही गोंदियाचा झेंडा फडकविला. मॅराथॉनमध्ये विविध गटांत उत्कृष्ट कामगिरी करून परत आलेल्या या खेळाडूंचे मंगळवारी (दि.२२) रेल्वे स्थानकावर पोलीस विभागाकडून जंगी स्वागत करण्यात आले.नक्षलग्रस्त आदिवासी भागातील खेळाडूंना मुंबईच्या राष्ट्रीय मॅराथन स्पर्धेत भाग घेता यावा यासाठी महात्मा गांधी जयंती निमीत्त २ आॅक्टोबर रोजी पोलीस विभागातर्फे अहिंसा मॅराथॉनचे आयोजन करण्यात आले होते. ही मॅराथॉन ४ तास ५८ मिनीटांत पूर्ण करणाऱ्या स्पर्धकांना मुंबई येथे झालेल्या राष्ट्रीय मॅराथन मध्ये भाग घेण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली. १२ मुलांना ५ डिसेंबर ते १८ जानेवारी दरम्यान नाशीक येथे प्रशिक्षण देण्यात आले. पोलीस अधीक्षक हरिष बैजल यांनी पुढाकार घेऊन त्या मुलांना विशेष प्रशिक्षण देण्याची सोय करून दिली होती. गोंदियात २ आॅक्टोबर रोजी महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून आयोजित केलेल्या अहिंसा मॅरेथान स्पर्धेत ७ हजार ६२० स्पर्धकांनी भाग घेतला होता. त्यातील १३२ स्पर्धेकांनी राष्ट्रीय मॅराथन स्पर्धेत सहभाग घेतला. प्रशिक्षणार्थ्यांना मुंबईला नेणे, राहणे, खाणे व परत येणे यासंदर्भात संपूर्ण व्यवस्था गोंदिया पोलीस विभागाने केली होती.मुंबई येथे रविवारी (दि.२०) घेण्यात आलेल्या राष्ट्रीय स्पर्धेत त्यांनी सहभाग घेऊन यशही पटकाविले. पूर्ण मॅराथॉन पुरूष मध्ये ३०, पूर्ण मॅराथॉन महिलांमध्ये ३६, अर्धी मॅराथॉन पुरूष ८, अर्धी मॅराथॉन महिला १७, १० किमी. मॅराथॉन पुरूष ६१, १० किमी. मॅराथनॉमध्ये ६९ महिला अशा एकूण १३२ खेळाडूंचा सहभाग होता.मुंबई मॅराथॉन वरून मंगळवारी (दि. २२) विदर्भ एक्स्प्रेसने सर्व खेळाडू परत आले असता रेल्वेस्थानकावर पोलिस विभागाच्या बँड पथकाने त्यांचे स्वागत करण्यात आले. विजयी खेळाडूंचे पुष्पगुच्छ देऊन पोलीस अधीक्षक बैजल व अधिकाऱ्यांनी स्वागत केले.यांनी पटकाविले पदकअर्धी मॅराथॉन पुरूषांमध्ये २५ ते ३० वर्षे वयोगटात सुभाष लिल्हारे याने सहावा क्रमांक पटकाविला असून त्याने १ तास १४ मिनीट ८ सेकंद घेतले. १० किमी. पुरूषांमध्ये संदीप चौधरी याने द्वितीय क्रमांक पटकाविला असून त्याने ३६.३१ मिनीटांत स्पर्धा पूर्ण केली. १० किमी. २५ ते ३० वयोगटात पुरूषांमध्ये अमोल चचाने याने चौथा क्रमांक पटकाविला असून ४०.४४ मिनीटांत स्पर्धा पूर्ण केली. नरेंद्र ठाकरे याने ४०.५२ मिनीटांत स्पर्धा पूर्ण करून पाचवा क्रमांक पटकाविला. तर १० किमी. महिलांमध्ये काजल मरठे हिने ५०.२७ मिनीट घेऊन पाचवा क्रमांक पटकाविला.