शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

चिमुकलीवरील बलात्काऱ्यास पाच वर्षांचा कारावास

By admin | Updated: February 14, 2016 01:41 IST

घरी भाड्याने राहणाऱ्या १० वर्षाच्या बालिकेवर बळजबरी करणाऱ्या नराधम घरमालकाला जिल्हा सत्र न्यायालयाने पाच वर्षाची शिक्षा व २ हजार ३०० रुपये दंड ठोठावला आहे.

घरमालकाचे कृत्य : विविध कलमान्वये शिक्षागोंदिया : घरी भाड्याने राहणाऱ्या १० वर्षाच्या बालिकेवर बळजबरी करणाऱ्या नराधम घरमालकाला जिल्हा सत्र न्यायालयाने पाच वर्षाची शिक्षा व २ हजार ३०० रुपये दंड ठोठावला आहे. सदर सुनावणी शुक्रवारी जिल्हा सत्र न्यायालयात करण्यात आली. गोंदिया शहर पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या संजयनगर पिंडकेपार येथील आरोपी भरतलाल बिजोबा मेश्राम (४५) याने घरी कुणीही नसल्याचे पाहून त्याच्या घरी भाड्याने राहणाऱ्या एका १० वर्षाच्या विद्यार्थीनीवर ३१ मे २०१४ ते ३ जून २०१४ या दरम्यान तिच्यावर बळजबरी केली. हा त्रास असह्य झाल्यानंतर नराधमाचे पितळ उघडले पडले. गोंदिया शहर पोलिसात त्याच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.आर.द्विवेदी यांनी केली. सरकारी वकील म्हणून अ‍ॅड.शबाना अंसारी यांनी काम पाहिले. या प्रकरणातील आरोपी भरतलाल बिजोबा मेश्राम (४५) रा.संजयनगर पिंडकेपार याला कलम ३७६ अंतर्गत पाच वर्षाची शिक्षा, ५०० रुपये दंड न भरल्यास एक महिन्याची शिक्षा, बाल लंैगिक अत्याचार अधिनियमाचे कलम ७, ८ अंतर्गत ३ वर्षाचा कारावास व ५०० रुपये दंड न भरल्यास एक महिन्याची शिक्षा, कलम ३५४ (अ) अंतर्गत एक वर्षाची शिक्षा २०० रुपये दंड, आणि दंड न भरल्यास १५ दिवसांचा कारावास, कलम ३७६ (ब) अंतर्गत ३ वर्षाचा कारावास व ५०० रुपये दंड, तसेच दंड न भरल्यास एक महिन्याची शिक्षा, अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्याचे कलम ३ अंतर्गत एक वर्षाची शिक्षा व २०० रुपये दंड, तथा दंड न भरल्यास १५ दिवसांची शिक्षा भादंविचे कलम १०६ नुसार १ वर्षाची शिक्षा २०० रुपये दंड, दंड न भरल्यास १५ दिवसाची शिक्षा, कलम ४१० अंतर्गत एक वर्षाची शिक्षा २८० रुपये दंड न भरल्यास १५ दिवसांची शिक्षा सुनावली. सदर प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक नखाते यांनी केला होता. (तालुका प्रतिनिधी)