दोघे पाण्यात बुडाले : एकाचा मारहाणीत मृत्यू गोंदिया : जिल्हा पोलिसांनी शनिवारी व रविवारी पाच घटनात पाच जणांचा मृत्यू झाल्याची घटना नोंद केली. करंट लागून एका महिलेचा मृत्यू, पाण्यात बुडून दोघांचा मृत्यू, बेदम मारहाणीत एकाचा मृत्यू तर भाजी बाजारात एकाचा मृतदेह आढळला.करंट लागून महिलेचा मृत्यू गोंदिया : शहराच्या साई कॉलोनीत/खापर्डे कॉलोनीतील रिता संजय मेश्राम (३५) या महिलेला रविवारी सकाळी ७.३० वाजता ३३ हजार वोल्ट चा करंट लागल्याने तिचा मृत्यू झाला. धुण्याची बकेट घेऊन घराच्या छतावर गेली असता तिला करंट लागला. विद्युत वाहिण्या रस्त्यापासून ८ फुट उंचीवर आहेत. वाहीण्या खाली झुकल्यामुळे कधीही धोका होऊ शकतो. अशी तक्रार विद्युत विभागाला करण्यात आली होती. तरी ही याकडे संबंधीत विभागाने लक्ष दिले नाही. वाहिण्याचा एकमेकाला स्पर्श झाल्यावर ठिणग्या उडतात. यातून आगीची घटना घडू शकतात. सदर घटनेसंदर्भात रामनगर पोलिसांनी आकस्मिक मृत्युची नोंद केली आहे. बोेडीत बुडून तरुणाचा मृत्यू गोंदिया : गोरेगाव तालुक्याच्या चिल्हाटी येथील शेतात असलेल्या बोडीत आंघोळ करण्यासाठी गेलेल्या तरुणाचा शनिवारच्या दुपारी १ वाजता मृत्यू झाला. मृत पावलेला तरुण चंद्रपूर येथील असून संदीप उर्फ गोलू पुनाराम बोपचे (२३) असे त्याचे नाव आहे. तो माणिकचंद जेटूलाल पारधी याच्या शेतात असलेल्या बोळीत मित्रांसोबत आंघोळ करायला गेला होता. मागील काही दिवसापासून तो सोनी येथे राहत होता. सदर घटनेसंदर्भात गोरेगाव पोलिसांनी आकस्मिक मृत्युची नोंद केली आहे. नदीत बुडून इसमाचा मृत्यू गोंदिया : पळसाचे पाने तोडण्यासाठी गेलेल्या इसमाचा नदीतील पाण्यात बुडून मृत्यु झाला. ही घटना शनिवारी सकाळी १० वाजता घडली. संजय गणेश सूर्यकार (३५) रा. घाटटेमनी असे मृताचे नाव आहे. पळसाचे पाने तोडताना तोल गेल्याने नदीतील पाण्यात बुडून त्याच्या मृत्यु झाला. सदर घटनेसंदर्भात आमगाव पोलिसांनी आकस्मिक मृत्युची नोंद केली आहे. मारहाण झालेल्या व्यक्तीचा मृत्यू गोंदिया : गंगाझरी पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या ओझीटोला येथील हरीलाल इसूलाल उईके(५५) यांच्या शनिवारी (दि.२५) रोजी मृत्यु झाला. दारुसंबधी हरीलालला १४ मार्च रोजी दारुबंदी समितीच्या महिला पुरुषांना त्याला मारहाण केली होती. त्याला उपचारासाठी केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार करून पुढील उपचारासाठी २१ मार्च रोजी नागपूरला रवाना केले होते. परंतु घरच्यानी नागपूरला न नेता घरीच परत आणले. शनिवारी त्याच्या घरीच मृत्यु झाला. हरीलाल उईके यांना मारहाण केल्यामुळे त्याच्या मृत्यु झाला आहे. सदर घटनेसंदर्भात गंगाझरी पोलिसांनी आकस्मिक मृत्युची नोंद केली आहे. यासंदर्भात अद्याप गुन्हा दाखल केला नाही. इसमाचा मृत्यू गोंदिया : सालेधारणी येथील शिवाजी सिताराम झंझार (६५) यांची २२ मार्च रोजी प्रकृती खालावल्याने त्यांना उपचारासाठी गोंदियाच्या मेडीकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले होते. परंतु उपचार घेताना शुक्रवारी त्याच्या मृत्यु झाला. (तालुका प्रतिनिधी)
पाच घटनांमध्ये पाच जणांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2017 00:55 IST