शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

पाच दिवसीय शतकोत्तर जयंती महोत्सव

By admin | Updated: April 9, 2016 02:06 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त १० ते १४ एप्रिलपर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

बाराभाटी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त १० ते १४ एप्रिलपर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. १० एप्रिलला सकाळी समता सैनिक दल व ग्रामस्थांची धम्मरॅली, त्यानंतर भीमबुद्ध गीतांचा कार्यक्रम होईल. उद्घाटन पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते, साहित्यिक कविता कापगते यांच्या अध्यक्षतेखाली होईल. यात वक्ते अ‍ॅड. भूपेंद्र रायपुरे, प्रा. जावेद पाशा, धम्मचारी अमृतसिद्धी मार्गदर्शन करतील. सायंकाळी ७.३० वाजता वामनदादा कर्डक आंबेडकरी जलसा चंद्रपूरद्वारे ‘आम्ही तुफानातले दिवे’ सादर करण्यात येईल. सुलभा खोब्रागडे, बाबुराव जुमनाके, सचिन फुलझेले सादर करणार आहेत.११ एप्रिल रोजी मुक्तांगण युवामंचतर्फे सायंकाळी ६.३० वाजता युगपुरूष महात्मा फुले यांची जयंती साजरी करण्यात येईल. यानंतर ७.३० वाजता भीमगीत समूहनृत्य स्पर्धा घेण्यात येईल. यात विजेत्यांना बक्षीस देण्यात येतील. १२ एप्रिलला सायंक़ाळी ८.३० वाजता ‘स्वप्न भंगले सुखाचे’ हा तीन अंकी नाट्यप्रयोग तरूण मित्र मंडळ सादर करतील. १३ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता संपूर्ण ग्रामस्वच्छता अभियान राबविण्यात येईल. त्यानंतर एस.एस. चव्हाण यांचा अंधश्रद्धेवर कार्यक्रम होईल. रात्री ८.३० वाजता प्रा. रेखाराम खोब्रागडे ‘युगपुरूष महात्मा ज्योतिबा फुले’ हा एकपात्री प्रयोग सादर करतील. १४ एप्रिल रोजी सकाळी ध्वजारोहण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व भगवान बुद्ध यांच्या पुतळ्यांना माल्यार्पण व दीप प्रज्वलन, सायंकाळी ४ वाजता धम्मरॅली व विविध झाकी सादर करण्यात येतील. सदर पाच दिवशीय कार्यक्रमाचे आयोजन नवेगावबांध येथे अध्यक्ष भास्कर बडोले, उपाध्यक्ष के.आर. उके, सचिव डी.डी. भालाधरे, कोषाध्यक्ष के.ए. रंगारी, सहसचिव एन.के. उके व सल्लागार राजकुमार उंदिरवाडे यांनी केले आहे. (वार्ताहर )