शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

मत्स्य व्यावसायिकांचे आरोग्य धोक्यात

By admin | Updated: August 20, 2016 00:51 IST

नगर परिषदेच्या मागील भागात अनेक वर्षांपासून मासोळी बाजार भरतो. नगर परिषद त्या विक्रेत्यांकडून करसुद्धा वसूल करते.

मासोळी बाजार संकटात : स्वच्छतेसाठी विक्रेत्यांचा आंदोलनाचा इशारा गोंदिया : नगर परिषदेच्या मागील भागात अनेक वर्षांपासून मासोळी बाजार भरतो. नगर परिषद त्या विक्रेत्यांकडून करसुद्धा वसूल करते. मात्र या बाजार परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले असून तेथील दृश्य अत्यंत किळसवाणे असते. दुर्गंधीने या व्यावसायिकांचे आरोग्यच धोक्यात आले आहे. नगर परिषदेच्या दुर्लक्षावर रोष व्यक्त करीत मत्स्य व्यावसायिकांनी मंगळवारी बाजार बंद ठेवल्याची माहिती आहे. सदर मत्स्य बाजार परिसराची पुढील तीन दिवसांत संपूर्ण स्वच्छता करण्यात यावी अन्यथा नगर परिषदेच्या फाटकासमोरच दुकानदारी मांडू, असा इशारा ढिवर समाज मच्छी मार्केट कृती समितीने दिला आहे. या विक्रेत्यांकडून नगर परिषद दररोज प्रत्येकी १० रूपये कर वसूल केला जातो. मात्र नगर परिषदेच्या नियोजनशून्य कारभारामुळे बाजार परिसरात मोठीच अस्वच्छता पसरलेली आहे. त्याकडे अधिकारी-पदाधिकारी लक्ष द्यायला तयार नाहीत. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे सर्वत्र चिखल व दुर्गंधीने कहर केला आहे. घाण दुर्गंधामुळे खरेदीदार त्रस्त झाले असून विक्रेत्यांनाही आरोग्यविषयक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. याबाबत गोंदिया ढिवर समाज मच्छी मार्केट कृती समितीच्या वतीने लेखी निवेदन नगर परिषदेला देण्यात आले आहे. परंतु त्याकडे पदाधिकारी-अधिकाऱ्यांनी कानाडोळा केला आहे. सदर बाजार परिसरात विद्युतची कसलीही सोय नाही. मत्स्य विक्रेत्यांना बसण्यासाठी ओटेसुद्धा नाहीत. त्यामुळे त्यांना रस्त्यावरच बसून मासोळ्या विक्री कराव्या लागतात. त्यांच्या व्यवस्थेसाठी नगर परिषदेने एका बोअरवेलची सोय तेथे केली आहे. परंतु ही बोअरवेलसुद्धा घाणीच्या विळख्यात सापडली असून तेथून दूषित पाणी निघत असल्याचा आरोपही विक्रेत्यांनी केला आहे. बोअरवेलकडे जाणाऱ्या मार्गावर चिखल साचले असून ती केवळ शोभेचीची ठरली आहे. परिसरात नगर परिषदेने स्वच्छता करावी व सोयीसुविधा पुरवाव्यात, यासाठी विक्रेत्यांनी मंगळवारी बाजार बंद ठेवला. बाजारातील ५० विक्रेत या बंदमध्ये सहभागी झाले होते. गोंदिया ढिवर समाज कृती समितीच्या वतीने हा बंद पुकारण्यात आला. तीन दिवसांत नगर परिषदेने यावर तोडगा न काढल्यास नगर परिषदेच्या फाटकासमोर दुकानदारी थाटू, असा इशाराही विक्रेत्यांनी दिला आहे. बंदमध्ये समितीचे अध्यक्ष प्रेम मौजे, सचिव महेश राऊत, सहसचिव नरेश भोयर, कोषाध्यक्ष राजू मेश्राम, कार्याध्यक्ष शैलेश नान्हे व सदस्य सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)