शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

बारदान्याअभावी शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2018 00:45 IST

शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी दर मिळू नये, यासाठी शासनाची एजन्सी म्हणून जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळ शासकीय धान खरेदी सुरू करुन धान खरेदी करते.

ठळक मुद्देशासकीय धान खरेदी : आदिवासी विकास महामंडळ, पंधरा रुपयांचा बारदाना २५ रुपयाला

लोकमत न्यूज नेटवर्कसडक-अर्जुनी : शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी दर मिळू नये, यासाठी शासनाची एजन्सी म्हणून जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळ शासकीय धान खरेदी सुरू करुन धान खरेदी करते. मात्र तालुक्यातील आदिवासी विकास महामंडळाच्या धान खरेदी केंद्रावर बारदाना उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक होत असल्याचे चित्र आहे.यावर्षी धानाच्या उत्पादनात वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे मागील दोन तीन वर्षांपासून दुष्काळी परिस्थितीला तोंड देत असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. शेतकरी मोठ्या आशेने धानाची मळणी करुन त्याची विक्री करण्यासाठी आदिवासी विकास महामंडळाच्या धान खरेदी केंद्रावर नेत आहेत. मात्र या केंद्रावर बारदाना उपलब्ध नसल्याने शेतकºयांना धानाची विक्री करण्यास अडचण जात आहे. गरजेपोटी शेतकरी धान खरेदी केंद्राबाहेरच खासगी व्यापाºयांना कमी दराने धानाची विक्री करीत आहे.त्यामुळे शेतकºयांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. सडक-अर्जुनी तालुक्यात आदिवासी विकास महामंडळाचे एकूण दहा शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्र सुरु आहे.सडक-अर्जुनी तालुक्यात आतापर्यंत ३० हजार क्विंटल धान खरेदी झाली आहे.धान खरेदी केंद्रामध्ये सडक-अर्जुनी, चिखली, कनेरी, परसोडी, खजरी, डव्वा, दल्ली, डोंगरगाव, कोयलारी, कोहमारा अशा केंद्राचा समावेश आहे.आदिवासी विकास महामंडळाने बारदाना उपलब्ध नसल्यामुळे आणि बारदान्याची टंचाई आहे. व्यापारी नेमक्या याच संधीचा फायदा घेवून १० ते १५ रुपये किंमत असलेला बारदाना २५ रुपये किमतीत विकत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक होत आहे. याकडेआदिवासी विकास महामंडळाने लक्ष देण्याची गरज आहे.२२ नोव्हेंबरला बारदाना खरेदीची निविदा उघडण्यात आली असून ८ ते १० दिवसात बारदाना उपलब्ध होण्याची प्रक्रिया पूर्ण होईल.-सुरेश आंबडकर, प्रादेशिक व्यवस्थापकआदिवासी विकास महामंडळाच्या शासकीय धान खरेदी केंद्रावर धान विक्रीस आणणाºया शेतकºयांना लवकरात लवकर बारदाना उपलब्ध करुन देण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहे.- राहुल पाटील, उपव्यवस्थापक नवेगावबांध.

टॅग्स :Marketबाजार