शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

आधी तुझं माझं जमेना, आता तुझ्या वाचून करमेना !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:30 IST

गोंदिया : व्यसनाधीनता, चारित्र्यावर घेतलेला संशय, घरातील क्षुल्लक कारणे, मोबाइल व सोशल मीडियाचा वाढलेला अतिवापर, प्रेम प्रकरणे व अनैतिक ...

गोंदिया : व्यसनाधीनता, चारित्र्यावर घेतलेला संशय, घरातील क्षुल्लक कारणे, मोबाइल व सोशल मीडियाचा वाढलेला अतिवापर, प्रेम प्रकरणे व अनैतिक संबंध यातून पती-पत्नीमध्ये मोठ्या प्रमाणात वाद होत आहेत. मागील दोन वर्षांत पती-पत्नीत झालेला वाद हा पोलिसांपर्यंत पोहोचला. सन २०२१ च्या जानेवारी व फेब्रुवारी या दोन महिन्यांत १५० तक्रारी पोलिसांच्या भरोसा सेलकडे प्राप्त झाल्या आहेत. या तक्रारींपैकी ९७ प्रकरणांत महिलांच्या भरोसा सेलने पती-पत्नीत समेट घडवून आणला आणि त्यांना पुन्हा वैवाहिक जीवन सुखकर करण्याचा मार्ग दाखविला. सन २०१९ मध्ये आलेल्या ३२६ तक्रारींपैकी १४८ प्रकरणांत समेट घडविला. सन २०२० या वर्षात २९१ तक्रारींपैकी १०० प्रकरणांत समेट घडवून आणले. जानेवारी व फेब्रुवारी २०२१ या वर्षातील ५५ तक्रारींपैकी ९ प्रकरणांचा निपटारा करण्यात आला. त्याला महत्त्वाचे कारण मोबाइल होते. घरात असलेली आर्थिक अडचण यामुळे पती-पत्नीत वाद होत असतात.

....................

म्हणे, बायको वारंवार माहेरीच जाते

पतीची असलेली व्यसनाधीनता, पतीकडून पत्नीच्या चारित्र्यावर घेतला जाणारा संशय हा घराची शांती भंग करण्यास कारणीभूत होत असतो. यातून पती-पत्नीत क्षुल्लक-क्षुल्लक कारणावरून होणारे वाद विकोपाला जातात. नवऱ्याकडे नांदायला आलेली पत्नीही वारंवार माहेरी जात असल्याने पती पत्नीत वाद होत असतो.

.............

जिल्ह्यातील सर्वच महत्वाच्या ठाण्यात भरोसा सेल

पती-पत्नीचे वाद सोडविण्यासाठी पोलीस विभागाकडून पोलीस ठाण्यात भरोसा सेल उभारण्यात आला आहे. या भरोसा सेलच्या माध्यमातून दाम्पत्यांचा वाद सोडविला जातो.

............

या कारणांमुळे पती-पत्नीचा वाद

पती मद्यपी, त्यातून पत्नीच्या चारित्र्यावर घेत असलेला संशय हा घराची शांती भंग करतो. मोबाईलचा होत असलेला अतिवापर यामुळे पती-पत्नीत वाद होतो. मोबाईलच्या माध्यमातून सोशल मीडियावर महिलांची वाढलेली सक्रियता ही या वादाची कारणे आहेत.

...................

वर्षभरात भरोसा सेलकडे आलेली प्रकरणे- १५०

प्रकरणात घडवून आणला समेट-९७