शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

पहिल्याच पावसात जिल्ह्यातील तलाव भरले

By admin | Updated: July 21, 2016 01:25 IST

गडचिरोली जिल्ह्यात यावर्षी पाऊस उशिरा सुरू झाला. मात्र पहिल्याच पावसात जिल्ह्यातील दिना जलाशय व इतर तलाव तुडूंब भरले आहेत.

शेती सिंचनासाठी सोय : धान रोवणीची कामे मात्र रखडली गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात यावर्षी पाऊस उशिरा सुरू झाला. मात्र पहिल्याच पावसात जिल्ह्यातील दिना जलाशय व इतर तलाव तुडूंब भरले आहेत. अनेक ठिकाणी तलाव भरल्यामुळे उन्हाळ्यात शेती सिंचनाची चांगली सोय निर्माण झाली आहे. अजून पावसाळ्याचे दीड ते दोन महिने बाकी असताना गडचिरोली जिल्ह्यातील तलाव भरल्यामुळे शेतकरी सध्या आनंदी आहे. यावर्षी पाऊस समाधानकारक झाला असला तरी गडचिरोली जिल्ह्यात धानाच्या पेरण्या केवळ १३ ते १५ टक्केच जवळपासच झाल्या आहेत. अनेक शेतकऱ्यांनी रोवणीसाठी टाकलेले पऱ्हे अतिवृष्टीमुळे कुजले व सडून गेले. त्यामुळे रोवणी करिता पऱ्हे मिळणे कठीण झाले आहे. पऱ्हे नसल्यामुळे रोवणीचे काम सध्या ठप्प आहे. जिल्ह्यात आतापर्यंत जिल्ह्यात ७३४.६ मिमी म्हणजे ५४.२ टक्के पाऊस झाला आहे. अनेक ठिकाणी तलावाच्या पाळ्या फुटल्याने शेतकऱ्यांचे पऱ्हे वाहून गेल्याच्याही घटना घडल्या आहेत. अहेरी तालुका वगळता जिल्ह्यात सर्वत्र चांगला पाऊस यंदा झाला आहे. (प्रतिनिधी) आतापर्यंत जिल्ह्यात ५५.५ टक्के पाऊस २० जुलै रोजी गडचिरोली जिल्ह्यात १०.३ मीमी पाऊस झाला आहे. गडचिरोली, कुरखेडा येथे पाऊस झाला नाही. तर आरमोरी येथे ७.३, चामोर्शी १४.८, सिरोंचा १४.४, अहेरी २८, एटापल्ली १२.८, धानोरा ४.७, कोरची ०.३, देसाईगंज २.३, मुलचेरा ३२.८, भामरागड तालुक्यात २२.६ मीमी पाऊस झाल्याची नोंद घेण्यात आली. ५५२ मीमी पाऊस जिल्ह्यात झाला असून यावर्षात ५५.५ मीमी पाऊस झाला असल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे. मागील वर्षी या कालावधीपर्यंत ८८.५ मीमी पाऊस झाला होता, असेही प्रशासनाने म्हटले आहे.