शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

नववधूवर पहिल्याच दिवशी भासऱ्याकडून अत्याचार

By admin | Updated: February 21, 2017 00:57 IST

एकमेकावर जीवापाड प्रेम करणाऱ्यांनी प्रेमविवाह केला. परंतु त्या नवदाम्पत्यांच्या लग्नाला घरच्यांचा विरोध होता.

जंगलातील घटना : प्रेमविवाहाला घरच्यांचा विरोधगोंदिया : एकमेकावर जीवापाड प्रेम करणाऱ्यांनी प्रेमविवाह केला. परंतु त्या नवदाम्पत्यांच्या लग्नाला घरच्यांचा विरोध होता. त्या विरोधामुळे गावाच्या मंदिरात लग्नाच्या दिवशी पहिलीच रात्र काढत असताना भासऱ्याने भावसुनेवर बलात्कार केला. या घटनेसंदर्भात सहा महिन्यानंतर आमगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.आमगाव तालुक्याच्या चिरचाळबांध कुणबीटोला येथील एका युगुलाने घरच्यांच्या विरोधाला न जुमानता मांडोबाई येथे १५ आॅगस्ट २०१६ रोजी लग्न केला. लग्न करून दोघेही घरी परतल्यावर त्यांना घरी ठेवण्यास घरच्यांनी विरोध केला. त्यामुळे त्या दाम्पत्यांनी पहिली रात्र गावाशेजारी असलेल्या बासीपार जंगल परिसरात मंदिरात काढण्याचे ठरविले. रात्री मंदिरात गेल्यावर पिडीत सिमा (बदललेले नाव) ला तहान लागली. तिच्यासाठी पाणी आणण्यासाठी नवरा गावात जाण्यापूर्वी रात्रीच्यावेळ असल्याने तिच्या मदती आपल्या मोठ्या भावाला बोलाविले. त्यानंतर तिचा पती पाणी आणायला गेला. आरोपी मनोज शालीकराम चव्हाण (२७) याने तिचे हातपाय बांधून त्यावेळी तिच्यावर रात्री ११ वाजता बलात्कार केला. लग्नाच्या पहिल्याच रात्री भासऱ्याने तिच्यावर बलात्कार केला. त्या नवदाम्पत्यांना घरी ठेवण्यास घरच्यांनी नकार दिल्यामुळे त्या जोडप्याने दुसऱ्या दिवशी मजूरीसाठी गुजरातला जाणे पसंत केले. ते दोघेही गुजरातला काही दिवस एकत्र राहील्यामुळे सिमाचा पती तेथून बेपत्ता झाला. एकटीच असलेल्या सिमाने आपला पती घरी गेला असावा म्हणून चार दिवसापूर्वी घर गाठले. घरी आल्यावर पती नव्हता मात्र तिला घरात घेण्यास सासू-सारे व भासऱ्याने विरोध केला. १५ आॅगस्ट रोजी भासऱ्याने केलेल्या बलात्कारासंदर्भात १९ फेब्रुवारी रोजी आमगाव पोलिसात तक्रार करण्यात आली. आमगाव पोलिसांनी यासंदर्भात आरोपी मनोज शालीकराम चव्हाण (२७) याच्या विरूध्द भादंविच्या कलम ३७६, ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. आमगाव पोलिसांनी आरोपीला रविवारीच ताब्यात घेतले. आज सोमवारी आमगाव न्यायालयात हजर केल्यावर न्यायालयाने आरोपीला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. तपास ठाणेदार प्रशांत भस्मे करीत आहेत. (तालुका प्रतिनिधी)