शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
3
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
4
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
5
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
6
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
7
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
8
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
9
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
10
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
11
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
12
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
13
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
14
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
15
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
16
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
17
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
18
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
19
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
20
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

रोहयोच्या कामाला गावकऱ्यांची पहिली पसंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2018 20:49 IST

येथील ग्रामपंचायतच्यावतीने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामाला ५-६ दिवसांपासून सुरुवात झाली आहे. गावात सुरु होणाऱ्या रोहयो कामाला ग्रामस्थांची प्राधान्याने पसंती असल्याचे चित्र प्रत्यक्षात कामावर असलेल्या मजुरांच्या उपस्थितीवरुन दिसून येत आहे.

ठळक मुद्देपाटचारी दुरुस्ती : सोईसुविधांचा अभाव

लोकमत न्यूज नेटवर्कबोंडगावदेवी : येथील ग्रामपंचायतच्यावतीने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामाला ५-६ दिवसांपासून सुरुवात झाली आहे. गावात सुरु होणाऱ्या रोहयो कामाला ग्रामस्थांची प्राधान्याने पसंती असल्याचे चित्र प्रत्यक्षात कामावर असलेल्या मजुरांच्या उपस्थितीवरुन दिसून येत आहे.महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत गादबोडी पाटचारी दुरुस्तीच्या कामाला शुक्रवारी (दि.२७) सुरूवात करण्यात आली. सदर कामावर गावातील सामान्य कुटुंबांसह सधन कुटुंबातील महिला-पुरुषांची संख्या मोठ्या प्रमाणात दिसून आली. भर उन्हामध्ये मजूर रोजी-रोटीसाठी आपल्या जिवाचा आटापिटा करताना दिसत होते.रोहयोच्या कामावर दगदग नाही म्हणून जे लोक मजुरीसाठी घराच्या बाहेर निघत नाही, अशा कुटुंबातील सदस्य सुध्दा कामावर मोठ्या प्रमाणात कार्यरत असल्याचे चित्र होते. मनरेगामुळे मजुरांच्या हाताला कामे उपलब्ध झाली आहे.मंडपाची सोय नाहीज्या परिसरात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे काम सुरु आहे. त्या ठिकाणी आवश्यक सुविधांचा पुरवठा करणे आवश्यक असते. रोहयोचे काम सुरु असलेल्या ठिकाणी मजुरांना थोडा वेळ विश्रांतीसाठी वा उन्हापासून बचाव होण्यासाठी मंडपाची कोणतीच सोय केलेली दिसून आली नाही. झाडाच्या खाली मजूर बसलेले दिसत होते.मॅटीन चोरीला गेलीकाम करताना मजुरांना थोडा विसावा वाटावा म्हणून हिरव्या मॅटीनचा मंडप लावला नाही असे विचारताच ग्राम रोजगार सेवक नाकाडे यांनी, दुसºया बाजूला तीन-चार पाटचारी दुरुस्तीचे काम केले. तिथे मॅटीनचा मंडप करण्यात आला होता. काम संपताच कोणीतरी ती मॅटीन चोरुन नेल्याचे त्यांनी सांगितले. कामावरुन मॅटीन चोरी गेल्याचा प्रकार कसा घडला हे एक कोडेच म्हणावे लागेल.