शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘ही’ ट्रिक वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
5
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
6
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
7
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
8
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
9
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
10
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
11
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
12
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
13
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
14
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
15
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
16
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
17
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
18
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
19
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
20
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
Daily Top 2Weekly Top 5

पहिल्याच दिवशी एटीएममध्ये ठणठणाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2018 21:07 IST

शहरात विविध कंपन्यांचे पन्नासावर एटीएम आहेत. मात्र रविवारी (दि.४) जवळपास सर्वच एटीएममध्ये नो कॅशचे फलक लागले होते. दिवाळीच्या पहिल्याच दिवशी एटीएममध्ये तुटवडा निर्माण झाल्याने पुढील तीन चार दिवस काय असा प्रश्न ग्राहकांसमोर निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देग्राहकांची भटकंती : कॅशचा तुटवडा, अर्ध्यापेक्षा अधिक एटीएम रिकामे

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शहरात विविध कंपन्यांचे पन्नासावर एटीएम आहेत. मात्र रविवारी (दि.४) जवळपास सर्वच एटीएममध्ये नो कॅशचे फलक लागले होते. दिवाळीच्या पहिल्याच दिवशी एटीएममध्ये तुटवडा निर्माण झाल्याने पुढील तीन चार दिवस काय असा प्रश्न ग्राहकांसमोर निर्माण झाला आहे. तर एटीएम घेवून खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांना आल्या पावलीच परत जाण्याची वेळ आली. त्यामुळे अनेकांचा हिरमोड झाला आहे.दिवाळीचा सण दोन दिवसांवर येऊन ठेपला असून बाजारपेठेत विविध वस्तूंची खरेदी करण्यासाठी ग्राहकांची मोठ्या प्रमाणात गर्दी वाढत आहे. रविवारी दिवाळीच्या पहिल्याच दिवशी वसूबारस निमित्त शहरातील व जिल्ह्यातील ग्रामीण भागातील नागरिक विविध वस्तूंची खरेदी करण्यासाठी बाजारपेठेत आले होते. जेव्हापासून एटीएमची सुविधा उपलब्ध झाली तेव्हापासून बरेच ग्राहक स्वत:जवळ रोख रक्कम न बाळगता एटीएम ठेवतात. तसेच शहरातील बाजारपेठ व इतर भागात विविध कंपन्याचे ५२ एटीएम आहे. यापैकी बाजारपेठ परिसरातील सर्वच एटीएममध्ये रविवारी नो कॅशचे बोर्ड लागले होते.तर शनिवारी सुद्धा बहुतेक एटीएममध्ये ठणठणाट होता. त्यामुळे ग्राहकांची चांगलीच अडचण झाली. शहरातील सर्वच विक्रेत्यांकडे एटीएम कार्ड स्वॉप करुन खरेदी करण्याची सुविधा नाही.काही मोजक्याच व्यावसायीकांकडे ही सुविधा आहे. त्यामुळे एटीएम कार्डच्या भरोश्यावर खरेदी करण्यासाठी आलेल्या अनेक ग्राहकांना खरेदी न करताच परत जावे लागले. रविवारी दुपारी स्टेट बँकेच्या एटीएममध्ये कॅश उपलब्ध होती. त्यामुळे या एटीएम केंद्राबाहेर पैसे काढण्यासाठी ग्राहकांची रांग लागली होती. मात्र संध्याकाळी हे एटीएम सुद्धा रिकामे झाले. परिणामी काही ग्राहकांना शहराबाहेरील एटीएम केंद्रात जावून पैसे काढण्याची वेळ आली आहे. दरम्यान या प्रकारामुळे ग्राहकांनी बँक प्रशासन आणि एटीएम कंपन्यांवर रोष व्यक्त केला.कार्डलेस व्यवहारासाठी नो कॅशदिवाळी दरम्यान ग्राहक विविध वस्तूंची खरेदी करतात. मात्र हा सर्व व्यवहार रोख रक्कमेने केला जातो. यामुळे बरेचदा कॅशची टंचाई निर्माण होत असते. केंद्रातील मोदी सरकारने नोटबंदीनंतर कार्डलेस व्यवहाराला अधिक प्राधान्य दिले आहे. यासाठी विविध अ‍ॅप देखील तयार केले आहे. पण, यानंतरही याला पाहिजे तसा प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळेच एटीएममध्ये कॅशचा तुटवडा निर्माण करुन ग्राहकांना कार्डलेस व्यवहाराची सवय लावण्याचा प्रयत्न केला जात असल्याची माहिती आहे.बहुतेक एटीएम सुरक्षा रक्षकाविनाचएटीएम मशीन्सची छेडछाड व फोडण्याचे घटना वाढत आहे. मात्र यानंतर बँका आणि संबंधित कंपन्यानी अद्यापही एटीएमच्या सुरक्षेबाबत पाऊल उचलले नाही. त्यामुळे केवळ सीसीटिव्ही भरोश्यावर एटीएमची सुरक्षा केली जात असल्याचे चित्र आहे. तर बहुतेक एटीएममध्ये सुरक्षा रक्षकाची नियुक्तीच करण्यात आली नाही.बँकांचे मौनशहरातील बहुतेक एटीएम हे राष्ट्रीयीकृत बँका आणि कंपन्याचे आहेत. मात्र या सर्व एटीएममध्ये शनिवार (दि.३)पासून ठणठणाठ आहे. यामुळे ग्राहकांना एटीएमच्या शोधात दूरवर भटकंती करावी लागत आहे. एटीएममध्ये निर्माण झालेल्या कॅशच्या तुटवड्याबाबत बँकाना विचारणा केली असता त्यांनी यावर काहीही बोलण्यास नकार दिला.