शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

माजी नगरसेवक लोकेश यादव यांच्यावर गोळीबार, शहरात तणाव

By अंकुश गुंडावार | Updated: January 11, 2024 14:54 IST

नगर परिषदेचे माजी नगरसेवक लोकेश (कल्लू) यादव यांच्यावर आज सकाळी ११ वाजताच्या सुमारास जीवघेणा हल्ला करण्यात आला.

गोंदिया : नगर परिषदेचे माजी नगरसेवक लोकेश (कल्लू) यादव यांच्यावर आज सकाळी ११ वाजताच्या सुमारास जीवघेणा हल्ला करण्यात आला. अज्ञात आरोपींनी त्यांच्यावर गोळीबार केल्याची घटना त्यांच्याच घराजवळील हेमू कॉलनी चौकात घडली. 

प्राप्त माहितीनुसार सध्या शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे शहराध्यक्ष तथा माजी नगरसेवक लोकेश (कल्लू) यादव (४४) हे आपल्या राहत्या घरातून मोटारसायकलने बाहेर जात असताना त्यांच्यावर दोन ते तीन अनोळखी मोटारसायकलस्वार तरुणांनी त्यांच्यावर गोळीबार केला. गोळीबारानंतर आरोपी पसार झाले.

लोकेश यादव यांच्या कमरेला गोळी लागली आहे. परिसरात उपस्थित त्यांच्या मित्रांनी यादव यांना जखमी अवस्थेत गोंदियातील कुंवर तिलक सिंग जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. येथील डॉक्टरांनी प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी नागपूर येथील वैद्यकिय महाविद्यालयात हलवण्याचा सल्ला दिला. यानंतर त्वरित नागपूरला हलविण्यात आले. घटनेची माहिती गोंदिया शहरात वाऱ्यासारखी पसरली. लोकांनी घटनास्थळी व नंतर के.टी.एस. जिल्हा शासकीय रुग्णालयात एकच गर्दी केली होती. काही काळ संपूर्ण शहरात तणावाचे वातावरण होते.

सराफा लाईन येथील दुकाने बंद करण्यात आली होती. पोलिसांनी लगेच संवेदनशील क्षेत्रात बंदोबस्त तैनात केल्यामुळे वातावरण शांत झाले. घटनास्थळाजवळील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले जात आहे. गोळीबार करणारे आरोपी लवकरच शोधले जातील. पोलिसांची चार पथके वेगवेगळ्या दिशेने रवाना करण्यात आली आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली.