कालीमाटी : वंजारीटोला येथील शेतकरी लिखिराम सोनवाने यांच्या घराला अचानक आग लागली. यात त्यांचे अंदाजे २ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. घरातील अन्नधान्य, कपडे व शेतीची औजारे जळून खाक झाली आहेत.तलाठी कार्यालय कालीमाटीच्या चमूने पंचनामा केला. त्यावेळी सरपंच मनिषा गौतम, सामाजिक कार्यकर्ते मनोज गौतम, उपसरपंच ठाकचंद पारधी, नारायण रहांगडाले, मोरध्वज हरिणखेडे, पृथ्वीराज सोनवाने, उत्तम तुरकर, लक्ष्मण हनवते, दिनदयाल हनवते, रोशन चौधरी, शामा कटरे, ताराचंद रहांगडाले, रामेश्वर बिसेन, यशवंत गौतम, सचिव शैलेश परिहार आदी पदाधिकारी उपस्थित होते. शासनाने त्वरित नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी जेष्ठ नेते सहेषराम कोरोटे यांनी केली आहे.(वार्ताहर)
वंजारीटोल्यातील घराला आग, दोन लाखांचे नुकसान
By admin | Updated: February 10, 2017 01:15 IST