शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

अग्निशमन विभागाला रिक्त पदांचे ग्रहण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2018 21:57 IST

आणिबाणीच्या स्थितीत महत्वाची भूमिका बजाविणाºया येथील अग्निशमन विभागाला रिक्त पदांचे ग्रहण लागले आहे. पदे रिक्त असल्यामुळे विभागाने आणखी २५ कर्मचाºयांची मागणी केली असून तसा प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे. रिक्त पदांमुळे मात्र विभागाच्या सेवेवर परिणाम पडत असून शिवाय याचा ताण कार्यरत कर्मचाºयांवर येत आहे.

ठळक मुद्देआणखी २५ कर्मचाऱ्यांची मागणी : शासनाकडे पाठविला प्रस्ताव

कपिल केकत ।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : आणिबाणीच्या स्थितीत महत्वाची भूमिका बजाविणाºया येथील अग्निशमन विभागाला रिक्त पदांचे ग्रहण लागले आहे. पदे रिक्त असल्यामुळे विभागाने आणखी २५ कर्मचाºयांची मागणी केली असून तसा प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे. रिक्त पदांमुळे मात्र विभागाच्या सेवेवर परिणाम पडत असून शिवाय याचा ताण कार्यरत कर्मचाºयांवर येत आहे.कोठेही आग लागल्याची घटना घडल्यास सर्वप्रथम आठवण येते ती अग्निशमन वाहनाची. शिवाय आणिबाणीच्या परिस्थितीतही अग्निशमन विभाग धावून येतो. यावरून अग्निशमन विभागाचे महत्व लक्षात येते. म्हणूनच अग्निशमन विभागाला पाहिजे त्या सुविधा पुरविणे हे सुद्धा तेवढेच महत्वाचे आहे. अग्निशमन विभाग परिपूर्ण असल्यास त्याचा फायदा जनतेलाच मिळतो. मात्र खेदाची बाब अशी की, येथील अग्निशमन विभागाला रिक्त पदांचे ग्रहण लागले आहे. विभागातील काही मुख्य पदांचाच विचार केल्यास तिही पूर्णपणे भरलेली नसल्याचे दिसत आहे.विभागातील या रिक्त पदांमुळे एकतर सेवेवर परिणाम पडतो. शिवाय विभागात कार्यरत कर्मचाºयांवर याचा ताण पडत आहे. विशेष म्हणजे, शासनाने अग्निशमन विभागासाठी २५ पदे मंजूर केल्याची माहिती आहे. त्यानुसार, येथील अग्निशमन विभागाकडून पदनिहाय किती कर्मचारी लागतील याचा प्रस्तावच शासनाला पाठविण्यात आला आहे. शासनाक डून २५ पदांना मंजुरी मिळाल्यास व ही पदे भरली गेल्यास अग्निशमन विभागाचा कारभार आणखी सुरळीत होणार असे अपेक्षीत आहे.अशी आहेत रिक्त पदेअग्निशमन विभागातील मुख्य काही पदांचीच पाहणी केल्यास आजघडीला लिडींग फायरमनची दोन पदे मंजू असून त्यातील एक पद रिक्त आहे. वाहन चालक-आॅपरेटरची चार पदे मंजूर असून त्यातील दोन पदे रिक्त आहेत. फायरमनची सहा पदे रिक्त असून एक पद रिक्त आहे. अशाप्रकारे १२ पैकी चार पदे रिक्त आहे. त्यामुळे विभागात सध्या ७ वाहनचालक कंत्राटी तत्वावर कार्यरत असून १२ फायरमन रोजंदारीने काम करीत आहेत. यावर विभागाने एक लिडींग फायरमन, १० वाहनचालक -आॅपरेटर व १४ फायरमन अशी एकूण २५ पदांची मागणी केली आहे.५ वर्षांपासून अग्निशमन अधिकाऱ्यांचे पद रिक्तसुमारे पाच वर्षांपासून येथील अग्निशमन अधिकाऱ्यांचे पद रिक्त पडून आहे. त्यामुळे येथील लिडींग फायरमनकडे प्रभार दिला जात असल्याची परंपरा सुरू आहे. सध्या लिडींग फायरमन छबीलाल पटले यांच्याकडे अग्निशमन अधिकाºयांचा प्रभार देण्यात आला आहे. याशिवाय अग्निशमन सह अधिकाºयांचेही पद मागील १० वर्षांपासून रिक्त पडून असल्याची माहिती आहे. विभागातील अशी महत्वाची पदे रिक्त पडलेली असून जिल्हा व नगर परिषद प्रशासनाचे कार्य किती सुरळीतपणे सुरू आहे याची प्रचिती येते.आणखी दोन वाहन मिळणारयेथील अग्निशमन विभागाकडे आजघडीला पाच अग्निशमन वाहन आहेत. याशिवाय आणखी दोन वाहन मिळणार आहेत. म्हणजेच अग्निशमन विभागाकडे वाहनांची कमतरता नाही. मात्र कर्मचारी कमी असल्यामुळे आहे त्या कर्मचाऱ्यांकडून काम काढून घेतले जात आहे.