शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

कोचिंग क्लासेसना ‘फायर आॅडिट’ची अ‍ॅलर्जी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2019 22:14 IST

२० जणांचा जीव घेणाऱ्या सूरत येथील घटनेने अवघ्या देशाला हादरून सोडले आहे. या घटनेतून मात्र कोचिंग क्लासेसमधील विद्यार्थ्यांचा जीव किती धोक्यात आहे, याची प्रचिती आली. विशेष म्हणजे, शहरातील कोचिंग क्लासेसकडून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला घेऊन काहीच उपाययोजना नसल्याची बाब पुढे आली आहे. परिणामी येथील विद्यार्थीही आपला जीव धोक्यात घालून कोचिंग क्लासेसमध्ये शिक्षण घेत असल्याचे म्हणणे वावगे ठरणार नाही.

ठळक मुद्देशहरातील विद्यार्थ्यांचाही जीव धोक्यात : सुरक्षेला घेऊन संचालकांचे हात वर

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : २० जणांचा जीव घेणाऱ्या सूरत येथील घटनेने अवघ्या देशाला हादरून सोडले आहे. या घटनेतून मात्र कोचिंग क्लासेसमधील विद्यार्थ्यांचा जीव किती धोक्यात आहे, याची प्रचिती आली. विशेष म्हणजे, शहरातील कोचिंग क्लासेसकडून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला घेऊन काहीच उपाययोजना नसल्याची बाब पुढे आली आहे. परिणामी येथील विद्यार्थीही आपला जीव धोक्यात घालून कोचिंग क्लासेसमध्ये शिक्षण घेत असल्याचे म्हणणे वावगे ठरणार नाही.सुरतमधील एका कोचिंग क्लासेसमध्ये आग लागल्याने तेथील २० विद्यार्थ्यांना आपला जीव गमवावा लागला. शुक्रवारी (दि.२३) घडलेल्या या घटनेने अवघा देश हादरून गेला. कोचिंग क्लासेसमध्ये आगीपासून सुरक्षेसाठी काहीच उपाययोजना नसल्याने विद्यार्थ्यांना इमारतीच्या चवथ्या माळ््यावरून उडी मारावी लागली. या घटनेने मात्र गोंदियातीलही कोचिंग क्लासेसमधील सुरक्षिततेच्या उपाययोजनांची पोलखोल केली आहे.शहरातील एकाही कोचिंग क्लासेसचे ‘फायर आॅडीट’ झाले नसल्याची माहिती आहे. सध्या स्थितीत शिक्षण क्षेत्रापेक्षा जास्त फायद्याचा दुसरा कोणताच व्यापार दिसून येत नाही.त्यामुळे सध्या कुणालाही व्यापार सुरू करावयाचा असल्यास एकतर शाळा नाहीतर कोचिंग क्लासेस उघडत आहेत. यामुळेच शहरात बघावे तेथे शाळा व कोचिंग क्लासेस दिसून येत आहेत. लाखो रूपयांची उलाढाल करतानाच मात्र त्यांच्याकडून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत हातवर केले जात आहे. सूरतमध्ये घडलेल्या घटनेने गोंदियातील कोचिंग क्लासेसवाल्यांचा हा व्यापार उघडकीस आणला आहे.येथील अग्निशमन विभागात विचारणा केली असता शहरातील एकही कोचिंग क्लासेसने ‘फायर आॅडिट’ केले नसल्याचे सांगीतले. त्यामुळे येथील कोचिंग क्लासेस मधील विद्यार्थी सुरक्षीत नसल्याची बाब पुढे आली आहे.एकंदरीत कोचिंग क्लासेस संचालकांना फायर आॅडिट करण्याची अ‍ॅलर्जी का हा प्रश्न मात्र अनुत्तरीत आहे.घटनेनंतर एकाला आली जागसुरतमधील घटना बघितल्यानंतर येथील एका कोचिंग क्लास संचालकाला जाग आली आहे. शहरातील हड्डीटोली रिंगरोडवर असलेल्या कॅरिअर झोन या कोचिंग क्लासेसची मोठी इमारत असून त्याचे ‘फायर आॅडिट’ झालेले नाही. त्यामुळे या कोचिंग क्लासेसच्या संचालकांनी शनिवारी येथील अग्निशमन कार्यालयात धाव घेतल्याची माहिती आहे. असे असताना मात्र अन्य कोचिंग क्लासेसनेही स्वेच्छेने त्यांच्या इमारतींचे ‘फायर आॅडिट’ करवून घेणे गरजेचे झाले आहे.अग्निशमन विभाग राबविणार मोहीमयेथील अग्निशमन विभागातील अग्निशमन अधिकारी लोकचंद भेंडारकर यांना याबाबत विचारणा केली असता त्यांनी, शहरातील मोठ्या कॉम्प्लेक्सवाल्यांना दोनदा नोटीस दिल्याचे सांगीतले. मात्र त्यांच्याकडून काहीच प्रतिसाद मिळत नसल्याची खंतही व्यक्त केली. त्यात आता सुरतमधील प्रकार घडल्याने शहरातील कोचिंग क्लासेसचे सर्वेक्षण सुरू करण्याची मोहीम राबविणार असल्याचे सांगीतले.नगर परिषदेने कठोर पाऊल उचलावेनगर परिषदेचा अजब-गजब कारभार कुणापासून लपलेला नाही. शहरात कित्येक मोठे कॉम्प्लेक्स तयार झाले काहीचे बांधकाम सुरू आहे आहेत. यातील तयार झालेल्या कित्येक कॉम्प्लेक्स मालकांकडून नगर परिषदेची परवानगी आहे. मात्र त्यांच्या कॉम्प्लेक्सचे ‘फायर आॅडिट’ झालेले नाही. अशात ‘फायर आॅडीट’ झाले नसताना मात्र त्यांच्याक डे नगर परिषदेची परवानगी आली कशी हा संशोधनाचा प्रश्न आहे. अगोदरच शहरातील बिंदल प्लाझामधील घटनेने जिल्हा हादरलेला आहे. त्यानंतरही एवढी मोठी चूक कशी होत आहे याची चौकशी करण्याची गरज असून ‘फायर आॅडिट’ न करविणाऱ्यांविरोधात कठोर पाऊल उचलण्याची मागणी शहरवासीयांकडून केली जात आहे.