शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

घनकचऱ्याच्या समस्येवर तोडगा सापडेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2018 21:11 IST

शहरातील घनकचऱ्याच्या समस्येवर नगर परिषदेला काही तोडगा मिळत नसल्याचे दिसून येत आहे. कारण, बघावे तेथे लागलेले कचऱ्याचे ढिगार याची प्रचिती करवून देते. सण असो वा उत्सव मात्र कचऱ्याची ही समस्या सुटता सुटत नसल्याचे चित्र आहे.

ठळक मुद्देबघावे तेथे कचऱ्याचे ढीग : नगर परिषदेकडे अद्याप जागाच नाही

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शहरातील घनकचऱ्याच्या समस्येवर नगर परिषदेला काही तोडगा मिळत नसल्याचे दिसून येत आहे. कारण, बघावे तेथे लागलेले कचऱ्याचे ढिगार याची प्रचिती करवून देते. सण असो वा उत्सव मात्र कचऱ्याची ही समस्या सुटता सुटत नसल्याचे चित्र आहे. परिणामी शहरवासीयांचा श्वास कोंडत चालला असून आणखी किती दिवस असे वावरावे लागणार असा सवाल आता शहरवासी करू लागले आहेत.जिल्ह्यात नव्याने निर्माण करण्यात आलेल्या नगर पंचायती आपल्या पायावर उभ्या होत असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. स्वच्छतेसाठी नगर पंचायतींमध्ये नवनवे प्रयोग राबविले जात असून त्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पासाठी पुढाकार घेत आहेत. मात्र जिल्ह्याचे स्थळ असलेल्या गोंदिया नगर परिषदेला याचे काहीच सोयरसुतक नाही. कारण शहरातील कचऱ्याची स्थिती आता बारमाहीच झालेली आहे. दिवस उजाडत चालले आहेत मात्र शहरवासीयांना घाणीच्या विळख्यात श्वास घ्यावा लागत आहे.बघावे तेथे कचºयाचे ढिगार हीच आता गोंदिया शहराची शान बनून राहिली आहे. शहरातील वस्त्या असो की वसाहती सर्वांची गत तीच आहे. सर्वत्र घाणीचे ढिगार आहे ते आहेच. नगर परिषदेकडून कचऱ्याची नित्यनेमाने उचल केली जाते. मात्र दुसऱ्या दिवशी परिस्थिती तीच असते, ही आश्चर्याची बाब आहे. यातून स्वच्छतेसाठी पाहिजे तसे प्रयत्न होत आहे की नाही असा प्रश्न पडतो. ते काही असो, मात्र या सर्वांचा त्रास शहरवासी भोगत आहेत. यातून नगर परिषदेचा स्वच्छता विभाग कोठेतरी कमकूवत पडत असल्याचे म्हणणे वावगे ठरणार नाही. आजघडीला शहरवासीयांचा नगर परिषद व निवडून दिलेल्या नगरसेवकांवरून विश्वास उडत चालला आहे.कचºयाचे ढिगार, त्यावर डुकरांचे कळप, कचऱ्यातून दुर्गंध व डासांची उत्पत्ती आजारांना पोषक ठरत आहे. अशा या वातावरणात शहरवासीयांचे आरोग्य कितपत सुरक्षीत आहे, ही गंभीर बाब आहे. यावर मात्र नगर परिषदेकडून तोडगा काढणे कठीण दिसत आहे. यामुळेच शहराचे वातावरण दिवसेंदिवस दिवस प्रदुषीत होत चाचले असून शहरवासीयांच्या आरोग्याचा प्रश्न अधिकाधिक गंभीर होत चालला आहे. त्यामुळे कचऱ्याच्या या समस्येवर त्वरीत तोडगा काढण्यात यावा अशी ओरड शहरवासी करीत आहेत.घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प नाहीनव्याने तयार करण्यात आलेल्या नगर पंचायत आता आपले घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प तयार करीत आहेत. असे असताना गोंदिया नगर परिषदेकडे घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प नाही. परिणामी घनक चऱ्यांची विल्हेवाट लावताना नगर परिषदेचीही कोंडी होत आहे. कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी प्रकल्पाची नितांत गरज आहे. मात्र नगर परिषदेकडे सध्यातरी यावर काहीच तोडगा नसल्याचेही दिसते कारण नगर परिषदेकडे प्रकल्पासाठी अद्याप जागाच नाही. अशात जागा कधी घेणार व कधी प्रकल्प सुरू केला जाणार हे सध्या स्पष्ट नाही. तोवर आहे त्या स्थितीतच शहरवासीयांना रहावे लागणार आहे.